शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

कोनसरीत गावकऱ्यांच्या पुढाकाराने लोह प्रकल्पाच्या कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

आज ४-५ देशात माझ्या कंपन्यांची कामे चालतात. तुम्ही मला साथ दिल्यास मी तुमच्या परिसराचे रूप बदलवून दाखवीन. मला कोणत्याही एका व्यक्तीचा विकास करायचा नसून सामूहिक विकासाला मी महत्त्व देतो. या प्रकल्पात स्थानिक लोकांनाच घेणार आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही सुरू करणार आहे. तुम्ही साथ देण्यासाठी तयार असाल तर मी तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईन. या भागात शिक्षणाच्या अद्यावत सोयीही उभ्या करणार, पण शिकून बाहेर जाऊ नका.

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या कोनसरी येथील लोह प्रकल्पाच्या उभारणीचे काम अखेर शुक्रवारी (दि.१९) विधीवत सुरू करण्यात आले. त्रिवेणी अर्थमुव्हर्स आणि लॉयड्स मेटल्सच्या संयुक्त विद्यमाने उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पस्थळी त्रिवेणी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन आणि लॉयड्स कंपनीचे संचालक अतुल खाडीलकर यांच्या हस्ते पूजाअर्चा करून या कामाला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे कोणीही राजकीय पुढाऱ्यांशिवाय केवळ कोनसरीतील गावकऱ्यांच्या सहभागाने आणि त्यांच्याच पुढाकाराने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, उपसरपंच रतनराम अक्केवार, पोलीस पाटील यशवंत मानापुरे, भूमिधारी शेतकरी समितीचे अध्यक्ष बंडू बारसागडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय कुमरे, माजी सरपंच चंद्रकांत बाेनगिरवार आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांसमोर बोलताना त्रिवेणीचे एमडी बी. प्रभाकरन म्हणाले, मला कमी बोलून जास्त काम करायचे आहे. एक शेतकरी म्हणून मी व्यवसायाला सुरुवात केली. आज ४-५ देशात माझ्या कंपन्यांची कामे चालतात. तुम्ही मला साथ दिल्यास मी तुमच्या परिसराचे रूप बदलवून दाखवीन. मला कोणत्याही एका व्यक्तीचा विकास करायचा नसून सामूहिक विकासाला मी महत्त्व देतो. या प्रकल्पात स्थानिक लोकांनाच घेणार आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही सुरू करणार आहे. तुम्ही साथ देण्यासाठी तयार असाल तर मी तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईन. या भागात शिक्षणाच्या अद्यावत सोयीही उभ्या करणार, पण शिकून बाहेर जाऊ नका. येथेच काम करा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी, महिला, शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.

३६ शेतकऱ्यांना तत्काळ नियुक्तीपत्र-    या प्रकल्पासाठी ज्यांनी पहिल्या टप्प्यात आपली शेतजमीन दिली त्या ३६ शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील एका सदस्याला यावेळी त्यांनी नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. या लोह प्रकल्पासाठी आधी ३६ शेतकऱ्यांची १२७ एकर जागा घेतली होती. आता आणखी ५० शेतकऱ्यांची २२५ एकर जागा विकत घेण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आम्ही खुल्या चर्चेसाठी तयार-   सुरजागड लोहखाणीबाबत कोणाला काही समज-गैरसमज असतील तर त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. आमच्या सर्व कामात पारदर्शकता आहे. त्यामुळे आम्ही याबाबत खुल्या चर्चेसाठी तयार आहे, अशी भूमिका त्रिवेणी अर्थमुव्हर्सच्या व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केली. 

पेपर मिल पुनर्जीवित कराहा कार्यक्रम सुरू असताना आमदार डॉ. देवराव होळी येऊन प्रेक्षकांमध्ये बसले. संचालनकर्त्याचे लक्ष जाताच त्यांनी डॉ. होळी यांना मंचावर पाचारण केले. यावेळी ते म्हणाले, मला बोलावले नसले तरी या भागाचा आमदार म्हणून कंपनीचे आभार व्यक्त करण्यासाठी मी आलो आहे, असे म्हणून त्यांनी बी. प्रभाकरन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, चार वर्षांपासून हे काम ठप्प असल्याने कोनसरीत लोहप्रकल्प होणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. अखेर हे काम सुरू झाल्याचा आनंद आहे. आष्टी पेपर मिललाही पुनर्जीवित करून रोजगाराचे द्वार खुले करावे, अशी अपेक्षा त्यांनी प्रभाकरन यांच्याकडून व्यक्त केली.

 

टॅग्स :FarmerशेतकरीDevrao Holiदेवराव होळी