शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

५० वर सिंचन विहिरींची कामे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 6:00 AM

रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरींच्या बांधकामासाठी शासनाकडून २ लाख ९० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. गेल्या पाच-सात वर्षांत नरेगाच्या योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी बांधण्यात आल्या. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फत धडक सिंचन विहीर योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतूनही शेकडो विहिरींचे काम मंजूर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देरोजगार हमी योजनेअंतर्गत कामे : निधीच्या अडचणीमुळे कुशल कामे माघारली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतीला सिंचन सुविधा निर्माण होऊन शेतीतील उत्पादन वाढावे, जेणे करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, या उद्देशाने शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत ५० पेक्षा अधिक सिंचन विहिरींचे काम अपूर्ण स्थितीत आहेत.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ व २०१७-१८ अशी दोन वर्ष मिळून एकूण १ हजार ५०० सिंचन विहिरींचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये अहेरी तालुक्याला १५२, आरमोरी १४७, भामरागड ८५, चामोर्शी १६२, देसाईगंज ५५, धानोरा १४५, एटापल्ली १५२, गडचिरोेली १४५, कोरची ११५, कुरखेडा १४२, मुलचेरा ११५ व सिरोंचा तालुक्यात ८५ विहिरींचा समावेश आहे. १ एप्रिल २०१६ ते २५ एप्रिल २०१८ पर्यंत १ हजार ५०० पैकी ७९० सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरींच्या बांधकामासाठी शासनाकडून २ लाख ९० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. गेल्या पाच-सात वर्षांत नरेगाच्या योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी बांधण्यात आल्या. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फत धडक सिंचन विहीर योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतूनही शेकडो विहिरींचे काम मंजूर करण्यात आले आहे. मात्र सदर विहीर बांधकामासाठी आवश्यक असलेले साहित्य वाजवी दरात व सहज आणि वेळेवर मिळत नसल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचे बांधकाम गतीने पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येतात. यासंदर्भात संबंधित प्रशासकीय यंत्रणेने तोडगा काढण्याची गरज आहे.मंजूर करण्यात आलेल्या नऊ सिंचन विहिरींना खोदकामादरम्यान दगड लागला. यामध्ये अहेरी तालुक्यातील एक, चामोर्शी एक, एटापल्ली दोन, धानोरा दोन व कुरखेडा तालुक्यातील तीन विहिरींचा समावेश आहे. लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे १३ सिंचन विहिरींचे काम सुरू होऊ शकले नाही. १९ सिंचन विहिरी नगर पंचायत क्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे या सिंचन विहिरींचे भवितव्य अंधारात आहे.वीज जोडणीच्या कामाला गती देण्याची शेतकऱ्यांची मागणीशासनाच्या रोजगार हमी योजना, धडक सिंचन विहीर तसेच जलयुक्त शिवारच्या योजनेतूनही सिंचन विहिरींची कामे गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षात मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आली. योजनेतून बांधलेल्या सिंचन विहिरींना कृषिपंप वीज जोडणी देण्याची योजना शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. विहिरींचे काम पूर्ण केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाकडे अर्ज सादर केले आहेत. सदर अर्ज व प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत महावितरणला सादर करण्यात आला. वीज जोडणीच्या डिमांडची रक्कम कृषी विभागामार्फत अदा करण्यात आली. मात्र १०० टक्के शेतकऱ्यांना कृषिपंप वीज जोडणी मिळाली नाही. कृषिपंपाला वीज जोडणी देण्याच्या कामाला बरीच दिरंगाई होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कामाला गती देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प