लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : राज्यात व केंद्रात आपला पक्ष सत्तेत नसला तरी राष्टÑीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. चुकांमुळे पक्षाने सत्ता गमावली. एकमेकांवर कुरघोडी झाल्याने जि. प. मधील सत्ताही गमवावी लागली. त्यामुळे येणाºया काळात आपसातील मतभेद विसरून एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी सिरोंचा येथे केले.राकॉ पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पार पडलेल्या मेळाव्याला जि. प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राकाँ महिला जिल्हाध्यक्ष पुण्यपवार, जिल्हा संघटक प्रभाकर बारापात्रे, जिल्हा उपाध्यक्ष फईमभाई, सिरोंचा पं. स. सभापती कमला गावडे, उपसभापती रिकुला क्रिष्णमूर्ती, नगरसेविका सरोजना मग्गोडी, संतोष परसा, वनिता पेदापल्ली, नगरसेवक नरेश अलोणे, सतीश भोगे उपस्थित होते.मेळाव्याच्या सुरूवातीला तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.गावाच्या विकासासाठी ग्राम पंचायत ही महत्त्वपूर्ण आहे. पुढील महिन्यात तालुक्यात होणाºया ग्रा. पं. निवडणुकीसाठी एकजुटीने काम करून राष्टÑवादी काँग्रेस पक्षाला भरघोष यश मिळवायचे आहे. त्यामुळे आत्तापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन जि. प. सभापती भाग्यश्री आत्राम यांनी केले. संचालन क्रिष्णमूर्ती चोकमवार, प्रास्ताविक रंजित गागापूरपू यांनी केले. यशस्वीतेसाठी भंडारी समय्या, सत्यनारायण चिल्कामारी, नागेश गागापूरपू, माजी सभापती संगेम लक्ष्मीनारायण, विजय रंगूवार, पिडगू सत्यनारायण, पेद्दी गोविंद, श्रीनिवास कडार्लावार, व्यंकटेश्वर बोरकुटे, प्रवीण दुर्गम, रमझान खान, मधुकर कोल्लुरी, शेख शकूर राणा, सतीश कडार्ला, चंद्रमा दुर्गम व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.रक्तदाते कार्यकर्त्यांचा सत्कार७ ते १५ वेळापर्यंत विविध शिबिरांमध्ये रक्तदान करणाºया राष्टÑवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष वासेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये सदाशिव दागम १५ वेळा, प्रवीण परकाला १४, संतोष नागपूरवार ११ तर विनय मंडावार ७ वेळा आदी रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.
मतभेद विसरून एकजुटीने कार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:44 PM
राज्यात व केंद्रात आपला पक्ष सत्तेत नसला तरी राष्टÑीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. चुकांमुळे पक्षाने सत्ता गमावली.
ठळक मुद्देरवींद्र वासेकर यांचे आवाहन : सिरोंचा येथे राष्टÑवादी काँग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा