प्रतीक मुधोळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागेपल्ली : येथून जवळ असलेल्या वांगेपल्ली गावालगत प्राणहिता नदीपात्रात महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सदर पुलाचे काम १० दिवसांत पूर्ण होणार असून त्यानंतर हा पूल नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.तेलंगणा सरकारच्या वतीने सदर पुलाचे काम सुरू असून २४ पिलरचा हा पूल आहे. ९० कोटी रुपयांतूून दोन राज्याला जोडणारा हा पूल होत आहे. प्राणहिता नदीवर पूल नसल्यामुळे तेलंगणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील नागरिकांना नावेने प्रवास करावा लागत होता. काहींना दुचाकीवरून प्रवास करताना आपला प्राण गवावा लागल्याच्याही घटना घडल्या. तेलंगणा राज्यातील गुड्डेम, कवटाळा, बेजूर, सिरपूर, कागदनगर आदी महत्त्वाची गावे अहेरी शहरापासून ७० किमी अंतराच्या वर्तुळात आहेत.अहेरी उपविभागातील नागरिकांना सध्या बल्लारपूरचे रेल्वेस्थानक जवळ होते. आता हा पूल झाल्यानंतर शिरपूर, कागदनगर हे रेल्वे जंक्शन जवळ पडणार आहे. सदर पुलामुळे दोन्ही राज्यातील नागरिकांचे रोटीबेटी व्यवहार आणखी घनिष्ठ होणार आहेत.तेलंगणा राज्याच्या सीमेवरील बºयाच गावातील नागरिक साहित्य खरेदीसाठी अहेरीच्या बाजारपेठेत येत असतात. तेलंगणाचे आमदार कोनेरू कोनप्पा यांनी पुलाच्या बांधकामासाठी प्रयत्न केले. पुलापासून मुख्य रस्त्याला जोडणाºया मार्गाचे काम सुरू झाले आहे. कोरोनामुळे सध्या राज्याची सीमा सिल असल्याने वाहतूक बंद आहे.
वांगेपल्ली पुलाचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 5:00 AM
तेलंगणा सरकारच्या वतीने सदर पुलाचे काम सुरू असून २४ पिलरचा हा पूल आहे. ९० कोटी रुपयांतूून दोन राज्याला जोडणारा हा पूल होत आहे. प्राणहिता नदीवर पूल नसल्यामुळे तेलंगणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील नागरिकांना नावेने प्रवास करावा लागत होता. काहींना दुचाकीवरून प्रवास करताना आपला प्राण गवावा लागल्याच्याही घटना घडल्या.
ठळक मुद्देरस्त्याच्या कामाला प्रारंभ : पावसाळ्यात होणारी गैरसोय थांबणार