शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

गोदावरी नदीमार्गे मजुरांचा गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 6:40 PM

तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर गोदावरी नदीमार्गे विविध घाटांवरून परतण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी एकाच दिवशी सुमारे २०४ मजुरांनी गोदावरीमार्गे सिरोंचा तालुक्यात प्रवेश केला. या सर्वांना ताब्यात घेऊन आठ आश्रयगृहात क्वॉरंटाईन करून ठेवण्यात आले.

ठळक मुद्देएकाच दिवशी २०४ जण ताब्यात आठ आश्रयगृहात केले क्वॉरंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर गोदावरी नदीमार्गे विविध घाटांवरून परतण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी एकाच दिवशी सुमारे २०४ मजुरांनी गोदावरीमार्गे सिरोंचा तालुक्यात प्रवेश केला. या सर्वांना ताब्यात घेऊन आठ आश्रयगृहात क्वॉरंटाईन करून ठेवण्यात आले.सिरोंचा व तेलंगणा राज्याची सीमा गोदावरी व प्राणहिता नदीने विभागल्या गेली आहे. लॉकडाऊन उठण्याची शक्यता मावळली असल्याने मिरची तोडणी व इतर कामासाठी गेलेले मजूर आता गोदावरी व प्राणहिता नदीमार्गे परतायला सुरूवात झाली आहे. गोदावरी नदीवरील कालेश्वर, पेंटीपाका, पोचमपल्ली, वडधम, अंकिसा, आसरअल्ली या नदी घाटांवरून पाणी कमी आहे. यामार्गे मजूर सिरोंचा तालुक्यात प्रवेश करीत आहेत.दर दिवशी मजुरांची झुंबड सिरोंचा तालुक्यात प्रवेश करीत आहे. रविवारी एकाच दिवशी सुमारे २०४ मजुरांनी सिरोंचा तालुक्यात प्रवेश केला. सदर मजूर हैदराबाद, जनगाम, खंमाम या शहरामध्ये काम करण्यासाठी गेले होते. त्यापैकी ११७ मजूर मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघाले. ते बालाघाटला जाणार होते, तर काही मजूर चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील होते.मजूर येत असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच आरोग्य व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिरोंचा शहराबाहेर त्यांना अडवून त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यांना त्याच ठिकाणी क्वॉरंटाईन ठेवले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नदीमार्गे मजूर सिरोंचा तालुक्यात प्रवेश करीत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांनी घाबरू नये. बाहेरून येणाºया प्रत्येक मजुराची आरोग्य तपासणी केली जात आहे, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.

आठ इमारतींमध्ये आश्रयगृहतालुका प्रशासनाने सिरोंचा शहरातील आठ ठिकाणी आश्रयगृह (शेल्टर होम) तयार केले आहेत. या ठिकाणी दुसºया जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाईन ठेवले जाणार आहे. सिरोंचात सद्य:स्थितीत सुमारे ४१८ मजूर क्वॉरंटाईन आहेत, अशी माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस