शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
2
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
3
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
4
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
5
काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
6
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
7
Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
9
श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."
10
महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?
11
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
12
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
13
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
15
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
16
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
17
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
18
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
19
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
20
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण

सात गावातील मजुरांना तेंदूपत्त्याचे पैसे मिळालेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 5:00 AM

तेंदूपत्ता मजुरीचे पैसे बाेनससह लवकर मिळतील, अशी अपेक्षा मजुरांना हाेती; परंतु मजुरांचा हिरमाेड झाला. आधीच झिंगानूर परिसरात राेजगाराच्या साधनांचा अभाव आहे. शेतीच्या भरवशावर नागरिक उपजीविका करतात. सिंचनाच्या साधनांचा अभाव असल्याने केवळ पावसाळी शेती केली जाते. कोणत्याही प्रकारचे दुबार पीक घेतले जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यात हमखास उत्पन्न देणारा हंगाम म्हणून तेंदूपत्ता संकलन केले जाते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिराेंचा तालुक्यातील झिंगानूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सात गावातील मजुरांनी मागील हंगामात आठ दिवस तेंदूपत्ता संकलनाचे काम केले हाेते. यापैकी ३ दिवसांची मजुरी संबंधित कंत्राटदाराने दिली; परंतु ५ दिवसांची मजुरी अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे या गावातील मजूर मजुरीपासून वंचित आहेत. सध्या मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मजुरी लवकर द्यावी, अशी मागणी सात गावातील मजुरांनी केली आहे. झिंगानूर ग्रामपंचायत अंतर्गत झिंगानूर चेक नंबर १,  झिंगानूर चेक नं. २, झिंगानूर माल, मंगीगुडम, पुल्लीगुडम, वडदेली, येडसिली आदी गावातील मजुरांनी तेंदूपत्ता संकलनाचे काम केले. तेंदूपत्ता मजुरीचे पैसे बाेनससह लवकर मिळतील, अशी अपेक्षा मजुरांना हाेती; परंतु मजुरांचा हिरमाेड झाला. आधीच झिंगानूर परिसरात राेजगाराच्या साधनांचा अभाव आहे. शेतीच्या भरवशावर नागरिक उपजीविका करतात. सिंचनाच्या साधनांचा अभाव असल्याने केवळ पावसाळी शेती केली जाते. कोणत्याही प्रकारचे दुबार पीक घेतले जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यात हमखास उत्पन्न देणारा हंगाम म्हणून तेंदूपत्ता संकलन केले जाते. सध्या खरीप हंगाम असल्याने शेतीसाठी कीटकनाशके, खते व अन्य वस्तू खरेदी कराव्या लागतात. शिवाय मजुरांना मजुरी द्यावी लागते. यासाठी पैसे आवश्यक आहेत. परिसरात राेजगार नसल्याने शेतीच्या भरवशावरच मजुरांना अवंलबून राहावे लागते. सध्या शेतकऱ्यांजवळ पैसा उपलब्ध नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने तेंदूपत्त्याची मजुरी लवकर द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कंत्राटदार झाला गायब- झिंगानूरच्या ग्रामपंचायतमध्ये कंत्राटदाराच्या उपस्थितीत हंगामापूर्वी लिलाव प्रक्रिया पार पडली हाेती. प्रती पुडा ११ रुपये प्रमाणे शेकडा १ हजार १०० रुपये दर तेंदूपत्त्याला मिळाला. उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केल्यानंतर लगेच पैसे दिले जातील, असे संबंधित कंत्राटदाराने सांगितले हाेते. मजुरांनी याच शब्दावर अनेक महिने प्रतीक्षा केली; परंतु कंत्राटदार पैसे देण्यासाठी फिरकला नाही. आठ दिवसांच्या कामापैकी केवळ तीन दिवसांचे पैसे मजुरांना मिळाले. उर्वरित ५ दिवसांचे पैसे कंत्राटदाराने मजुरांना दिले नाही. त्यामुळे मजूर अनेक दिवसांपासून पैसे मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग