लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात भामरागड तालुक्यातील अनेक मजूर मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. दरम्यान त्यांनी गोदावरी नदीतून पायदळ वाट काढली. सिरोंचा तालुक्याच्या पेंटिपाका येथे पोहोचल्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासगी बसची व्यवस्था करून त्यांना भामरागडात आणले. येथे वैद्यकीय तपासणी करून त्यांना स्वगावी पाठवत त्यांच्या घरी विलगिकरणात (होम क्वॉरंटाईन) ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.भामरागड तालुक्यातील ११ महिला व पुरूष दोन महिन्यापूर्वी मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्याच्या भुपालपल्ली जयशंकर जिल्ह्यातील महादेवपूर गावात गेले होते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे सदर मजूर महादेवपूर गावातच अडकले. तेलंगणा सरकारने या मजुरांना रेशन व ५०० रूपयांची मदत दिली. मात्र असे किती दिवस जगायचे, असा विचार करून सदर मजूर महादेवपूरवरून पायदळ निघाले. गोदावरी नदी ओलांडून सिरोंचा तालुक्याच्या पेंटिपाका येथे पोहोचले. येथे पोलिसांनी त्यांना अडविल्यावर त्यांनी आपबिती कथन केली. आम्हाला घरी जाण्याची मुभा द्या, अशी विनंती केली.पोलिसांनी त्यांच्या कॅम्पमध्ये असलेल्या विलगीकरण कक्षात मजुरांना आणले. याची माहिती महसूल विभागाला दिली.२२ एप्रिलला सकाळी ८ वाजता पेंटिपाकावरून एक खासगी बसगाडीमध्ये बसवून या मजुरांना भामरागड येथे पाठविण्यात आले. भामरागडचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार व न. पं. मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य चमुमार्फत या मजुरांची आरोग्य तपासणी करून घेतली. त्यानंतर त्यांना स्वगावी पाठविले. अडचणीत सापडलेल्या या मजुरांनी सिरोंचा पोलीस व महसूल प्रशासनाचे आभार मानले.होम क्वॉरंटाईनची जोखीम धोकादायकमिरची तोडाईसाठी तेलंगणा राज्यात गेलेले मजूर कोरोनाबाधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ एका वैद्यकीय तपासणीतून ते बाधित आहे किंवा नाही हे कळत नाही. तरीही या मजुरांना आपापल्या घरी पाठविण्यात आले. दोन खोल्यांच्या घरात संसार करणाºया या मजुरवर्गासाठी होम क्वॉरंटाईन होऊन राहताना इतर लोकांच्या संपर्कात येण्याचे टाळणे त्यांच्यासाठी शक्य नाही. तरीही होम क्वॉरंटाईन करण्याची जोखीम पत्करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेलंगणातून परतलेल्या मजुरांना संस्थांत्मक विलगीकरण कक्षात काही दिवस ठेवणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात आले नाही.
तेलंगणात अडकलेले मजूर भामरागडात परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 5:00 AM
भामरागड तालुक्यातील ११ महिला व पुरूष दोन महिन्यापूर्वी मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्याच्या भुपालपल्ली जयशंकर जिल्ह्यातील महादेवपूर गावात गेले होते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे सदर मजूर महादेवपूर गावातच अडकले. तेलंगणा सरकारने या मजुरांना रेशन व ५०० रूपयांची मदत दिली. मात्र असे किती दिवस जगायचे, असा विचार करून सदर मजूर महादेवपूरवरून पायदळ निघाले.
ठळक मुद्देगोदावरी नदीतून काढली वाट : स्वगावी पाठवून केले होम क्वॉरंटाईन