या सप्ताहादरम्यात मृत नक्षलींना शहीद संबोधून त्यांची मोठ-मोठी स्मारके बांधली जातात, सोबतच नक्षल चळवळ मजबूत करण्याकरिता नागरी वसाहतीत जाऊन चळवळीचे उद्देश सांगितले जातात. तसेच हिंसक कारवाया करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाताे. नक्षल्यांना कारवाया करण्यासाठी संधी मिळू नये म्हणून या कालावधीत ग्रामीण भागातील शासकीय व खासगी कामे बंद ठेवण्याच्या सूचना केल्या जातात.
नक्षल बंदचा फटका तालुक्यातील इतर कामांसह सूरजागडमधील लोहखाणीच्या कामालाही बसला आहे. त्रिवेणी अर्थमुव्हर्स या कंपनीमार्फत लोहखनिज काढण्यासाठी तयारी सुरू आहे. तसेच एटापल्ली-आलापल्ली मार्गाचे काम सुरू होते, तेही बंद करण्यात आले. जीवगट्टा येथे शेड उभारणीचे काम सुरू होते, तेसुद्धा सप्ताहाच्या दोन दिवसांपूर्वीपासून बंद करण्यात आले.