शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

जागतिक पर्यावरणदिनी चकाकले आलापल्लीचे ‘ग्लाेरी ऑफ फाॅरेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2022 5:00 AM

कार्यक्रमाला आलापल्लीचे सहायक वनसंरक्षक नितेश देवगडे, मिरकलचे गाव प्रमुख करपा कुळमेथे, गाव पाटील डोबी गावडे व आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, नितेश देवगडे यांनी कर्मचारी व ग्रामस्थांना पर्यावरण चळवळीचा इतिहास सांगून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व उपस्थित नागरिकांना पटवून दिले. तसेच पर्यावरण संवर्धनाकरिता जीवसृष्टीमध्ये प्रत्येक जीव महत्त्वाचा असून, पर्यावरण संरक्षणाकरिता प्रत्येक नागरिकांनी याेगदान देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

लाेकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आलापल्ली वनपरिक्षेत्रात सायकल रॅलीसह विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्लाेरी ऑफ फाॅरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलापल्ली येथे वनपरिक्षेत्र कार्यालय व मिरकलवासीयांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबवून परिसर चकाचक करण्यात आला, तर मिरकल तलावातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ह्या कार्यक्रमात  ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाला आलापल्लीचे सहायक वनसंरक्षक नितेश देवगडे, मिरकलचे गाव प्रमुख करपा कुळमेथे, गाव पाटील डोबी गावडे व आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, नितेश देवगडे यांनी कर्मचारी व ग्रामस्थांना पर्यावरण चळवळीचा इतिहास सांगून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व उपस्थित नागरिकांना पटवून दिले. तसेच पर्यावरण संवर्धनाकरिता जीवसृष्टीमध्ये प्रत्येक जीव महत्त्वाचा असून, पर्यावरण संरक्षणाकरिता प्रत्येक नागरिकांनी याेगदान देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन झिमेलाचे क्षेत्र सहायक मोहन भोयर, तर आभार विशेष सेवा वनपाल पूनमचंद  बुद्धावार यांनी मानले. दरम्यान, वनपरिक्षेत्र कार्यालय ते ग्लोरी ऑफ आलापल्लीपर्यंत १६ किमी लांब मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सदर रॅलीव्दारे तलवाडा व मिरकल गावात वनसंरक्षण व पर्यावरणविषयी जनजागृती करून वृक्षाराेपण करण्यात आले. उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी वनपाल अनिल झाडे, ऋषिदेव तावाडे,  रेखा किरमिरे, वनरक्षक  देवानंद कचलामी, दामोदर चिव्हाणे, सचिन जाभुळे, ऋषी मडावी, चंद्रकांत सडमेक,  संतोष चव्हाण, बक्का कुळमेथे, महेंद्र येलीचपूरवार, साहिल झाडे, लक्ष्मी नान्हे, वंदना कोडापे,  वनमजूर बंडू रामगिरवार, निखिल गड्डमवार, वाहनचालक सचिन डांगरे व नागरिकांनी सहकार्य केले.

पहिल्यांदाच सहभागाने मिरकलवासी भारावलेवनविभागाच्या वतीने सदर अभियानात गावकऱ्यांना प्रथमच सामावून घेतल्याबद्दल ग्रामस्थांना पर्यावरणाचे महत्त्व कळले असून, मिरकलवासीय तथा वनविभागाचे नाते असेच दृढ होत गेल्यास ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ येथील पर्यटनाचा विकास होऊन स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा आशावाद करपा कुळमेथे यांनी व्यक्त केला. वनविभागाने उपक्रमात सहभागी केल्याबद्दल मिरकलवासी भारावले.

 

टॅग्स :forest departmentवनविभागWorld Environment DayWorld Environment Day