आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी हे निसर्गपूजक असून, पारंपरिकरीत्या निसर्गातील संसाधनांचे जतन करीत आहेत. निसर्गातील झाडे, पाणी, पक्षी, दगड हे त्यांचे तोटेम प्रतीक आहे. या ताेटेमचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी मानतात. निसर्गाशी संबंधित आपली संस्कृती व उपजीविका याचे रक्षण करणे हे आदिवासी नागरिक आपले कर्तव्य समजतात. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारणा २०१२ वन हक्क कायदा व पंचायत संबंधी अनुबंध अनुसूचित क्षेत्रावर विस्तार अधिनियम १९९६ नियम २०१४ पेसा कायदा, जैवविविधता कायदा आदी कायद्यांमुळे आदिवासींचे अधिकार अधिक मजबूत झाले आहेत; परंतु आजही शासनाकडून विविध प्रकल्पासाठी विकासाच्या नावावर आदिवासींची संसाधने हिसकावून घेतली जात आहेत. रावपाट गंगाराम घाट यात्रेच्या माध्यमातून आदिवासी बांधव धार्मिक कार्यक्रमांसह आपले अधिकार व हक्क तसेच सामाजिक समस्यांवर चर्चा करतात. या माध्यमातून विविध गावांतील पदाधिकाऱ्यांचे विचारमंथन हाेते; परंतु यावर्षी काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून यात्रा रद्द करण्यात आली.
बाॅक्स
प्रस्तावित झेंडेपार खाणीचा विराेध
काेरची तालुक्यातील झेंडेपार येथे खाण प्रस्तावित हाेती; परंतु या खाणीच्या कामाला नागरिकांनी तीव्र विराेध केला. खाणी विरोधात संघर्ष म्हणून ही यात्रा दरवर्षी भरविली जाते. इलाख्यातील ग्रामसभा आदिवासींच्या विकासावर चर्चा करतात. मात्र, यंदा कोराेनामुळे कोणतेही कार्यक्रम न घेता केवळ पारंपरिक पूजा करून तीन दिवसीय यात्रा व अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले.