शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

विवेकानंद नगरातील मोहफूल दारू अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:14 PM

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दीपरतन गायकवाड यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह रविवारी दुपारी १ वाजता शहराच्या विवेकानंद वार्डातील वृध्दाश्रम परिसरातील मोहफूल दारू अड्ड्यावर धाड.....

ठळक मुद्देगडचिरोली पोलिसांची कारवाई : ४ लाख ८२ हजारांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दीपरतन गायकवाड यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह रविवारी दुपारी १ वाजता शहराच्या विवेकानंद वार्डातील वृध्दाश्रम परिसरातील मोहफूल दारू अड्ड्यावर धाड टाकून मोहफूल दारू, सडवा, कार व दारू गाळण्याचे साहित्य मिळून एकूण ४ लाख ८२ हजार ३२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी इम्रान खान युनूस खान पठाण (३१) व शेख रफीक अब्दुल कुरेशी रा. विवेकानंद नगर गडचिरोली या दोघांना अटक करून त्यांचेवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शेख रफीक अब्दुल कुरेशी यांच्या घरातून मोहफूल दारूने भरलेले ४१ लहान ड्रम, सडव्याने भरलेले दोन मोठे ड्रम व एक कार जप्त केली. २२ हजार रूपयांची मोहफूल दारू, १ लाख २२ हजार ५०० रूपये किमतीचा सडवा, ३ लाख रूपयांची कार तसेच तीन सिलिंडर व शेगळ्या आदी साहित्य जप्त केल्या. सदर कारवाई ठाणेदार गायकवाड, एपीआय उदार, गोनाडे, उराडे, बेसरकर, निर्मलवार, गौरवार, डोंगरे, गलगट, पातकमवार आदींनी केली. दारू विक्रेते आरोपी हे राहत्या घरात गॅसवर दारू गाळण्याचे काम करीत होते. पहाटेच्या सुमारास वाहनाने मोहफूल दारू इतरत्र पोहोचविली जात होती. दारू व सडव्याचा वास येऊ नये, यासाठी आरोपींनी साहित्याच्या ठिकाणी व परिसरात डांबरगोळ्या टाकल्या होत्या. या डांबरगोळ्या जप्त करण्यात आल्याची माहिती ठाणेदारांनी दिली.ठाकरी येथे ८६ हजार रूपयांची दारू जप्तआष्टी : आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ठाकरी येथे पोलिसांनी रविवारी सकाळी ९ वाजता सापळा रचून वाहन व दारू जप्त केली. वाहनाची किंमत ५ लाख रूपये तर दारूची किंमत ८६ हजार ४०० रूपये आहे. सत्यवान नागुलवार (३२), संजय मंडल (३७) दोघेही रा. आष्टी व दुषांत कारपुरवार (२२) रा. ठाकरी या तिघांना अटक केली. सदर कारवाई आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दिलीप लुकळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नितेश गोहणे, विजय जगदाळे, संघरक्षित फुलझेले, प्रमोद मडावी, विनोद गौरकार, इंदल राठोड यांनी केली. तेलंगणा राज्यातून दारू आणली जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार रात्रभर मार्गावर पाळत ठेवली. रविवारी सकाळी १० वाजता शेतशिवारात वाहन उभे करून वाहनात दारू भरताना तिन्ही आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस