लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : सलग तीन वर्षांपासून शेतशिवार परिसरातील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात धानपिकाची लागवड न करण्याचा निर्णय तुकूम येथील २५ ते ३० शेतकऱ्यांनी घेतला आहे. परिणामी यंदा दीडशे एकरवर शेतजमीन पडिक राहण्याची शक्यता आहे.शासनाने शेतकºयांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या उद्देशाने सिंचनाची सुविधा केली. धानोरापासून पाच किमी अंतरावर तुकूम येथे सन २०११-१२ या वर्षात सिंचन विभागाच्या वतीने बंधारा बांधण्यात आला. मात्र हा बंधारा गेल्या दोन वर्षांपासून फुटला आहे. बंधारा फुटल्यामुळे पाणी कठाणी नदीला जात आहे. परिणामी गेल्या तीन वर्षांपासून या परिसरातील दीडशे एकर शेतजमिनीचा सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र दखल घेण्यात आली नाही. अखेर शेतकºयांनी एकत्रित येऊन बंधाऱ्याचे थातुरमातूर काम केले. मात्र पावसाच्या प्रवाहाने काहीही फायदा झाला नाही.पाण्याने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात शेतजमिनीत धान पिकाची लागवड करणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला आहे. सिंचन विभागाच्या वतीने तुकूम येथे नव्याने बंधाºयाचे बांधकाम मंजूर करण्यात आले असून निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. मात्र प्रत्यक्षात कामास सुरूवात झाली नाही. त्यामुळे तुकूम गावातील शेतकºयांंनी नुकसानीच्या भितीपोटी यंदाच्या खरीप हंगामात आपल्या शेतजमिनीत धान पिकाची लागवड करायची नाही, असा निर्णय घेतला आहे.पूर परिस्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तलाव व बंधारे गेल्या दोन वर्षात फुटले. मात्र त्याची पक्की दुरूस्ती सिंचन विभागाच्या वतीने झाली नाही.जि.प. सिंचन विभागाची उदासीनता चव्हाट्यावरशासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून धानोरा नजीकच्या तुकूम येथे बंधाºयाचे काम मंजूर करण्यात आले आहे. सदर काम करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या गडचिरोली येथील उपविभागीय कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. सदर बंधाºयाचे काम करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच केली होती. मात्र या विभागाने कामास प्रारंभ केला नाही, असा आरोपही तुकूम येथील २५ ते ३० शेतकऱ्यांनी केला आहे.आता खरीप हंगामास प्रारंभ झाला असून धान पऱ्हे टाकण्याची वेळ आली आहे. आता कोणतीही यंत्रणा सदर बंधाºयाचे काम करण्यासाठी शेतशिवार परिसरात आली तर काम करू देणार नाही, असा इशारा माणिक सिडाम, रवींद्र मेश्राम, देवजी तोफा, मंगल सिडाम, चंदू उसेंडी, लहू तोफा, श्यामराव तोफा, बाबुराव तोफा, आनंदराव आतला आदी शेतकºयांनी दिला आहे.
यंदा दीडशे एकरवरील शेतजमीन राहणार पडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:45 PM
सलग तीन वर्षांपासून शेतशिवार परिसरातील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात धानपिकाची लागवड न करण्याचा निर्णय तुकूम येथील २५ ते ३० शेतकऱ्यांनी घेतला आहे. परिणामी यंदा दीडशे एकरवर शेतजमीन पडिक राहण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देतुकूम शेतशिवारातील बंधारा पावसाच्या प्रवाहाने फुटला : धानपीक न घेण्याचा २५ ते ३० शेतकऱ्यांचा निर्णय