लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : देसाईगंज तालुक्यातील तुळशी-कोकडी परिसरातील धानपिकावर तुडतुडा पिकाने आक्रमण केले आहे. तुडतुड्यामुळे निवसलेल्या धानाची तणीस होत चालली असल्याने शेतकरी धास्तावला आहे.यावर्षी अगदी सुरुवातीपासून नियमित व समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे धानपीक जोमात होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, अशा शेतकºयांचे धान हिरवेगार होते. त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा अधिक उत्पन्न होईल, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग बाळगून होता. मात्र धानपिकावर आता तुडतुडा रोगाने आक्रमण केले आहे.जडधान निसवले आहे. निवसलेल्या धानावर तुडतुड्याने आक्रमण केल्याने धानाच्या लोंबासह पीक करपत चालले आहे. मागील वर्षी देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात मावा व तुडतुडा रोगाने धानाची शेती उद्ध्वस्त केली होती. हजारो हेक्टरवरील धान करपले होते. विशेष म्हणजे तुडतुडा रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. तुडतुडा रोगापासून धानाला वाचविण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. मात्र रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.तुळशी येथील नंदू सुकारे, शांताबाई लोथे, वासुदेव लोथे, रमेश अवसरे, दुधराम सुकारे, बाबुराव सुकारे आदी शेतकºयांचे धानपीक नष्ट झाले आहे. रोवणीसाठी लाखो रूपयांचा खर्च शेतकºयांनी केला आहे. धानकापणीसाठी आता केवळ १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अशातच तुडतुडा रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी चिंतातूर आहे.कृषी व महसूल विभागाच्या अधिकाºयांनी पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी मागणी तुळशीच्या सरपंच रेखा तोंडफोडे यांच्यासह परिसरातील शेतकºयांनी केली आहे. मागील वर्षीही तुडतुडा पिकाने आक्रमण केले होते.मागील वर्षीची मदत अजूनपर्यंत काही शेतकºयांना मिळाले नाही. ज्यांना मिळाले, ती अतिशय तुटपुंजी आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
यावर्षीही तुडतुड्याचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:04 AM
देसाईगंज तालुक्यातील तुळशी-कोकडी परिसरातील धानपिकावर तुडतुडा पिकाने आक्रमण केले आहे. तुडतुड्यामुळे निवसलेल्या धानाची तणीस होत चालली असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : तुळशी-कोकडी परिसराला फटका