ठाणेगाव येथील आरोग्य केंद्राच्या परिसरात साेमवारी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी लोकांना योग, व प्राणायामचे धडे देण्यात आले. तसेच पद्मासन, अनुलोम-विलोम, प्राणायाम यांचे महत्त्व सांगून दररोज किमान किती तास योग करावा, तंदुरुस्त राहण्यासाठी योग, प्राणायाम व्यायाम किती गरजेचा आहे, हे योगशिक्षिका राजश्री राऊत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व मनोगत राजश्री राऊत यांनी केले. कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी गायत्री झोडे, वासुदेव पिलारे, आशा वर्कर सुनीता नक्षिणे व गावातील नागरिक, उपस्थित होते. मंचावरील पाहुण्यांचे स्वागत वृक्ष भेट देऊन करण्यात आले. भेट दिलेल्या राेपट्यांची लागवड करून त्यांचे संगाेपन करण्याची जबाबदारी देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार आरोग्य सेवक सुधीर राऊत यांनी मानले.
मन, बुध्दी आणि शरीराचे प्राणायामने मिलन म्हणजे योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:25 AM