योग करणाऱ्यांचे ‘अच्छे दिन’ येतात, रामदेवबाबा यांचा राहुल गांधींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 06:33 PM2018-02-19T18:33:06+5:302018-02-19T18:34:54+5:30
राहुल गांधी जिमसोबतच योगाही करीत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधीही योगा करायचे. सोनिया गांधीसुद्धा योगा करतात. गांधी परिवार योगा करायला लागला आहेत. योग करणाऱ्यांचे अच्छे दिन येतात, असा टोला योगगुरु रामदेबबाबा यांनी लगावला.
चंद्रपूर : राहुल गांधी जिमसोबतच योगाही करीत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधीही योगा करायचे. सोनिया गांधीसुद्धा योगा करतात. गांधी परिवार योगा करायला लागला आहेत. योग करणाऱ्यांचे अच्छे दिन येतात, असा टोला योगगुरु रामदेबबाबा यांनी लगावला.
कारभारात पारदर्शकता आणून भ्रष्टाचारमुक्त देश घडवून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकपालची गरज आहे. पंतप्रधान पद हे देशाचे महत्त्वाचे पद आहे. या पदाची विश्वासार्हता जोपासण्यासाठी हे पद लोकपालच्या कक्षेत आणू नये, असेही रामदेवबाबा यावेळी म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे राज्याचे अर्थ, नियोजन, वने मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून २० ते २२ पर्यंत नि:शुल्क योग चिकित्सा व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त योगगुरु रामदेवबाबा चंद्रपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधात आंदोलनाच्या तयारीत आहे. परंतु देशाचा कारभार पारदर्शक असेल, तर आंदोलन करण्यात अर्थ नाही. अण्णा हजारे यांचे वय आता वाढलेले आहेत. राजकीय मंडळी त्यांचा फायदा घेत आहे. जेव्हा ते यातून दूर होऊन भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करतील. तेव्हा त्यांच्यासोबत राहीन, असेही रामदेवबाबा म्हणाले.
भ्रष्टाचारावर उपाय म्हणून पाचशे व हजार रुपयाच्या नोटा बंद कराव्यात, अशी आपली भूमिका होती. आजही ती कायम आहे. नोटबंदीमुळे बराच काळा पैसा बाहेर आला. त्यांच्यावर कारवायादेखील झाल्याचे दिसून आले. सरकारने ५०० व हजाराची नोट बंद करून दोन हजाराची नोट चलनात आणली. मात्र हे योग्य नाही, असे त्यावेळी आपण सांगितले होते. ही नोट अधिक काळ चलनात दिसणार नाही. ती बंद होईल, अशी शक्यताही यावेळी रामदेवबाबा यांनी व्यक्त केली. देशातून बाहेर गेलेला काळा पैसा परत आणावा, या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू असून आपलाही पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले.
एक पैसा जमा करतो दुसरा मोदी तो पळवितो
सैद्धांतिक आधारावर काळ्याधनावर कार्यवाही करण्याची जबाबदारी सरकारची आहे. यावर पंतप्रधान मोदी यांनी कार्यवाही केलेली आहे. मात्र एक मोदी पैसा बँकेत जमा करतो आहे. आणि दुसरा मोदी जमा केलेला पैसा पळवितो आहे. हा राष्ट्रद्रोह आहे. राष्ट्रद्रोह समजून कारवाई करण्याची तरतूद संसदेने करायला पाहिजे. बँकेत नोटबंदीनंतर झालेल्या पैशाचे नियोजन करण्याचीही गरजही रामदेवबाबा यांनी व्यक्त केली. बाहेर देशात गेलेले काळेधन परत यावे, यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले.
मुनगंटीवार हे जनतेच्या आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्तीसाठी झटणारे राजकारणी
मागील २५ वर्षांपासून राजकारणात विजेता ठरलेले ना. सुधीर मुनगंटीवार जनतेच्या मनात राज करीत आहेत. राजकारणात राहुन जनतेसाठी आरोग्य, शिक्षण आणि व्यसनमुक्तीसाठी ते झटत आहेत. सर्वांना शूून्य टक्के बजेटमध्ये आरोग्य लाभावे, अशी त्यांची भावना आहे. म्हणून त्यांच्या पुढाकारातून मूल येथे तीन दिवसीय योगचिकित्सा व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही रामदेवबाबा यावेळी म्हणाले.