पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आरोपी सहारे याने कोरचीतील एका ३६ वर्षीय महिलेच्या दुकानात भरदिवसा शिरून ‘तू माझ्यासोबत का बोलत नाहीस, मला का भेटत नाहीस ’ असे म्हणून हात पकडून तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला. यामुळे पीडित महिलेने दि. २१ ला कोरची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर भादंवि कलम ३५४, ३५४ ड, ४४८, ५०९, ३२३, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. बुधवारी कोरची पोलिसांनी आरोपीला कुरखेडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांचा एमसीआर दिला.
(बॉक्स)
यापूर्वीही देत होता त्रास
सदर आरोपीविरुद्ध पीडित महिलेने यापूर्वीही कोरची पोलिसात तक्रार दाखल केली होती, त्यावेळी त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपीच्या वर्तनात कोणतीच सुधारणा होत नसल्याने शेवटी त्या महिलेने त्रासून कोरची पोलीस ठाण्यात पुन्हा धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार आरोपी सहारे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास कोरची पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनात हवालदार अमृता नैताम करीत आहे.