जिल्हा मुख्यालय ते चामोर्शी तालुका मुख्यालयापर्यंत सध्या या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मागील वर्षीपासून सदर रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी जुन्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. परंतु सदर काम संथगतीने सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कोरोनामुळे नागरिक घराबाहेर पडत नव्हते. परिणामी रस्ते ओसाड दिसत होते. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेत आहे. शेतीचीही कामे सुरू झाली आहेत. यामुळे आता रस्त्यावरून वाहतूक वाढणार आहे. यातच रस्त्याची एक बाजू खोदून ठेवली असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन युवक काँग्रेसच्यावतीने सोमवारी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी निवेदनातून दिला.
युवक काॅंग्रेसचे साेमवारी घंटानाद आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:28 AM