लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पोलीस व आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने एटापल्ली येथे मंगळवारी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या दौड स्पर्धेत शहर व तालुक्यातील अनेक युवक-युवती धावल्या.अहेरीचे अप्पर पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात एटापल्ली शहरातील महाविद्यालय, शाळेतील मुला-मुलींच्या दोन गटात एटापल्ली-कसनसूर या मुख्य मार्गावर वीर बाबुराव शेडमाके चौक ते एकरा फाट्यादरम्यान सकाळी ८.३० ते ९.४५ यावेळेत आदिवासी विकास दौड स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी एटापल्लीचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप, पोलीस उपनिरीक्षक अरूण डोंबे, संजय राठोड, शिक्षक धोंगडे, आत्राम आदी उपस्थित होते.सदर मॅरेथॉन स्पर्धेत भगवंतराव आश्रमशाळा, भगवंतराव महाविद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, जि. प. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गावातील काही युवक व नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. सदर दौड स्पर्धेदरम्यान वैैद्यकीय पथकास पाचारण करण्यात आले होते.
एटापल्लीत युवक-युवती धावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:03 AM
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पोलीस व आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने एटापल्ली येथे मंगळवारी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या दौड स्पर्धेत शहर व तालुक्यातील अनेक युवक-युवती धावल्या.
ठळक मुद्देउत्स्फूर्त प्रतिसाद : पोलीस व आदिवासी विकास विभागातर्फे दौड