लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उद्योगातून आर्थिक व सामाजिक उन्नती साधता येते. केंद्र शासनाने उद्योजकांना मदत करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन उद्योग स्थापन करावे, असे प्रतिपादन पद्मश्री मिलींद कांबळे यांनी केले.दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिज, स्माल इंडस्ट्रिज डेव्हलमेंट, मेक इन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उद्योजकांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी चौधरी, जे.बी.सिंगतराव, निश्चय शेळके, गोपाल वासनिक, प्रकाश इटनकर, लिड बँकेचे व्यवस्थापक प्रमोद भोसले, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक बैस, मुकेश कुमार, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी बडे, एमआयडीसीचे व्यवस्थापक गिरी, रूपराज गौरी, पंकज बोकारे, जॉनी दासरवार, श्रीनिवास दंतुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.उद्योजकांच्या उन्नतीसाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. प्रत्येक युवकाने आता उद्योगाची कास धरावी, देशातील उद्योगाला चालना देऊन आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी २०१४ मध्ये मेक इन इंडियाच्या माध्यमातून सुरू केला आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी चालना दिली आहे. गडचिरोली या मागासवर्गीय जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी लवकर परवानगी मिळावी, यासाठी शासनाने ‘इझी आॅफ डुर्इंग बिजनेस’ ही आॅनलाईन प्रणाली सुरू केली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार व गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मध्यम मार्गाने जाऊन अनुसूचित जाती व जमातीतील युवतींनी धरणे आंदोलन करण्यापेक्षा उद्योग स्थापन करावे, देशातील ११५ आकांक्षित जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश असून या जिल्ह्यात उद्योग निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. केंद्र सरकारने २५ टक्के, राज्य सरकारने ३० टक्के अशी एकूण ५५ टक्के सबसिडी व ५ टक्के व्याज दर देण्याचे धोरण अवलंबिले आहे. याचा फायदा अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन केले.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मार्गदर्शन करताना युवकांनी लाभार्थी होण्यापेक्षा उद्योजक बनावे, व दुसऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असे आवाहन केले. संचालन सविता साधमवार यांनी केले. यशस्वीतेसाठी मेक इन गडचिरोलीचे संयोजक रमेश अधिकारी, जनार्धन साखरे, राकेश भैसारे, प्रसाद गुंफलवार यांनी सहकार्य केले.
युवकांनी उद्योगासाठी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:00 PM
उद्योगातून आर्थिक व सामाजिक उन्नती साधता येते. केंद्र शासनाने उद्योजकांना मदत करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन उद्योग स्थापन करावे, असे प्रतिपादन पद्मश्री मिलींद कांबळे यांनी केले.
ठळक मुद्देपद्मश्री मिलींद कांबळे यांचे प्रतिपादन : जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजकांना मार्गदर्शन