कोरचीत युवा संमेलन : क्रिष्णा गजबे यांचे आवाहनकोरची : युवकांनी जिद्दीने शिक्षण क्षेत्रात यशाचे शिखर गाठून करिअर घडवावे, उच्चशिक्षित युवकांनी जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था विदर्भ नागपूर संस्था व एकलव्य एकल विद्यालयाच्या वतीने मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर आयोजित युवा संमेलनाच्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे प्राध्यापक राजू हडप होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, कोरचीचे नगराध्यक्ष नसरूद्दीन भामानी, पं.स. सभापती अवधराम बागमूळ, उपसभापती गोविंदराव दरवडे, जि.प. सदस्य पद्माकर मानकर, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष शालू दंडवते, देसाईगंज नगर पंचायतीचे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा राजू जेठाणी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नानाजी आत्राम, कोरची नगर पंचायतीचे उपाध्यक्ष कमलनारायण खंडेलवार, आनंद चौबे, संवर्ग विकास अधिकारी डी. एम. वैरागडे, रमेशभाई पटेल, डॉ. शैलेंद्र बिसेन, नगरसेवक गुड्डू अग्रवाल, श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य गजबे, न.प.चे उपाध्यक्ष केसर अंबादे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विद्यार्थी व युवकांच्या शिक्षण व रोजगाराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. एकलव्य एकल विद्यालय संस्था कोरचीच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक कार्य सुरू आहे, आमदार क्रिष्णा गजबे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गजभिये, संचालन नगराध्यक्ष नसरूद्दीन भामानी यांनी केले. यावेळी आरोग्य विभागातर्फे सिकलसेल, रक्तनमुने तपासणी, रक्तदान व आरोग्य शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील सर्व महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
युवकांनी जिल्हा विकासात योगदान द्यावे
By admin | Published: December 30, 2015 1:58 AM