जलसंवर्धन करण्याचे आवाहन : गडचिरोलीत जलसंपदा विभागाचा पुढाकारगडचिरोली : पाण्याचा दुष्काळ पडू नये, जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी याकरिता जलसंवर्धन करणे गरजेचे आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जलजागृती सप्ताह १६ ते २२ मार्च या कालावधीत राबविला जात आहे. या सप्ताहात रविवारी गडचिरोली येथे जलजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत युवा, कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले. इंदिरा गांधी चौक ते पाटबंधारे विकास विभाग कार्यालयापर्यंत जलदौड आयोजित करण्यात आली. या दौडमध्ये क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू जलसंपदा विभागातील कर्मचारी व स्थानिक नागरिक सहभागी झाले. पाण्याचा अपव्यय वाढला आहे. उन्हाळ्यात दिवसेंदिवस पाण्याची टंचाई भासत असते. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलसंवर्धन होणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात कमीत कमी पाण्याचा वापर करावा, यासाठी नागरिकांमध्ये दौडच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. कार्यकारी अभियंता एन. एस. टोंगे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, जिल्हा माहिती कार्यालयाचे स्वप्नील महले, वामन खंडाईत, मनरेगाचे सुरेश कांती व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)स्पर्धेतील विजेतेजलजागृती दौड स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंसह स्थानिक नागरिक व कर्मचारी सहभागी झाले. या स्पर्धेत आकाश शेंडे, प्रमेश्वर भोयर, खुमन चिराम, रितेक पंचबुद्धे, ओमसाईराम कुमरे, मृणाली सराफ, तिलोतमा परखेड, सरिता तलांडे, प्रियंका गेडाम, सविता तलांडे यांनी प्रथम पाच मुला-मुलींमध्ये स्थान मिळविले. नागरिकांमध्ये जलसंवर्धन व पाण्याचा योग्य वापर व्हावा, या विषयी जनजागृतीसाठी दौड आयोजित करण्यात आली.
जलजागृतीसाठी युवांची दौड
By admin | Published: March 21, 2017 12:51 AM