क्रांतिदिनापासून साखळी उपोषण : पेसा कायद्यात सुधारणा करागडचिरोली : जिल्ह्यातील गैरआदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासोबत इतर विविध मागण्यांसाठी १२ जुलै रोजी खासदार व आमदारांच्या कार्यालयासमोर युवक काँग्रेसने घंटानाद आंदोलन केले होते. त्यावेळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करू असे आश्वासन खासदार व आमदारांनी दिले होते. मात्र या प्रकरणात कोणताही निर्णय शासनस्तरावरून झालेला नाही. त्यामुळे ९ आॅगस्टपासून स्थानिक इंदिरा गांधी चौकात युवक काँगे्रसतर्फे साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निलेश राठोड यांनी दिली आहे. गैरआदिवासी बांधवांना नोकरीपासून हद्दपार करणाऱ्या पेसा कायद्याच्या ९ जून २०१४ च्या अधिसूचनेत सुधारणा करण्यात यावी, ओबीसीचे आरक्षण १९ टक्के करावे या मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
गैरआदिवासींच्या हक्कासाठी युकाँचे आंदोलन
By admin | Published: August 09, 2015 1:31 AM