लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगार ओबीसी समाजबांधव तसेच आदिवासी व गोरगरीब जनतेच्या विविध प्रश्नांकडे राज्यशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवासेनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी आरमोरी येथील तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली.युवासेनेचे जिल्हा प्रमुख चंदू बेहरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, चौैकशी करून कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाºया बँकेच्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, वनहक्क पट्ट्याचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावून पट्टे देण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदन देताना चंद्रशेखर मने, श्रीरंग धकाते, शंकर सातव, माणिक भोयर, प्रशांत सोनकुंवर, भूषण सातव, अक्षय बागडे, कुणाल भरणे, बंडू गायकवाड व कार्यकर्ते हजर होते.
युवासेनेची तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 1:09 AM
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगार ओबीसी समाजबांधव तसेच आदिवासी व गोरगरीब जनतेच्या विविध प्रश्नांकडे राज्यशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवासेनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी आरमोरी येथील तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : कर्जमाफी, पीक कर्जाच्या प्रश्नावर चर्चा