युवा संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने गडचिरोली येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते आले होते. गडचिरोलीच्या युवा सेनेचे काम उल्लेखनीय असून त्यांच्या जोडीला आता युवती सेनाही काम करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवा सेनेचे प्रमुख तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना महाराष्ट्रात अधिक विस्तारत आहे. शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढणार काय या प्रश्नावर ते म्हणाले की, संघटन मजबूत असेल तर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास शिवसेना तयार आहे. त्यासाठीच युवा सेना व इतर आघाड्यांच्या माध्यमातून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. निवडणुका कशा लढायच्या याचा निर्णय शिवसेनेचे वरिष्ठ नेते ठरवतील. युवा सेनेच्या पुढाकाराने युवा स्किलच्या माध्यमातून पाचशे युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला, अशी माहिती दिली. पत्रकार परिषदेला युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य व जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
युवा सेना विद्यापीठाच्या निवडणुकीत उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:42 AM