शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

झाडीपट्टी रंगभूमी पडली ओस, उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 8:58 PM

यावर्षी कोरोनाच्या सावटात सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. ओस पडलेल्या ‘झाडीवुड’मुळे हजारोंच्या रोजगारावर गदा आली आहे.

ठळक मुद्देनाट्य कंपन्यांनी कार्यालये बंदकोरोनाच्या संकटाने हिरावला हजारो हातांचा रोजगार

अतुल बुराडेलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: झाडीपट्टी म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भालाच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातही दरवर्षी हजारो प्रयोग सादर करणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीला १५ ऑगस्टपासून नाटकांच्या तालमीचे वेध लागतात. तेव्हापासून तारखा बुक होण्यास सुरूवात होऊन पुढे दिवाळीपासून हिवाळा संपेपर्यंत गावागावांत विविध नाटकांचे प्रयोग सादर होऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. पण यावर्षी कोरोनाच्या सावटात सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. ओस पडलेल्या ‘झाडीवुड’मुळे हजारोंच्या रोजगारावर गदा आली आहे.दिवाळीच्या पाडव्याला नाटकांच्या सादरीकरणास सुरूवात होते, तर दोन ते चार महिन्यांपूर्वीपासूनच पूर्वतयारी, सुनियोजन सुरू होते. मात्र यावर्षी सप्टेंबर उजाडला तरी झाडीपट्टी रंगभूमीची राजधानी म्हणून ओळख असलेल्या देसाईगंजमध्ये (वडसा) अजून कशालाच सुरूवात नाही. अजून एकाही नाटक कंपनीने आपले कार्यालय उघडले नाही. नाट्य कंपनीचे काम सुरू झाल्यानंतर नाटकाची निवड, निर्मिती प्रमुख, दिग्दर्शक, कलावंत, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्थ हे सर्व ठरवावे लागते. त्यासाठी दरवर्षी १५ ऑगस्टला वडसा ते लाखांदूर आणि वडसा ते ब्रम्हपुरी या मार्गाच्या दोन्ही बाजूला नाटक कंपन्यांची कार्यालये उघडली जातात. नाटकांच्या होर्डिंग्जने दोन्ही मार्ग फुलून जातात. गेल्यावर्षी ५५ नाट्य कंपन्यांनी वडसा येथून नाटकांचे बुकिंग केले. यावर्षी मात्र हा मार्ग ओसाड पडला असून सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.

नाटकांच्या प्रयोगानुसार कलावंत, वादक, गायक, पडद्यामागील कलाकार, वाहन चालक, मालक यांना आपापला मोबदला मिळतो. याशिवाय प्रयोगादरम्यान भरणाऱ्या मंडईमुळे इतरही हजारो लोकांना हंगामी रोजगार मिळतो. मंडईच्या दिवशी रात्रभर गावात नाटक चालते. गावातील प्रत्येक घरातील लोक तिकीट काढून नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी जातात. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. हे नाटक म्हणजे केवळ मनोरंजनाचा भाग नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक उत्सवच असतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे गर्दी होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही. त्यामुळे कित्येक वर्षांची परंपरा असणारी झाडीपट्टी रंगभूमी यावर्षी पहिल्यांदाच अबोल झाली आहे.

महामंडळाच्या सभेत होणार मंथनकोरोना संसर्गाचा वाढता आलेख पाहता यावर्षी नाटकांचा हंगाम धोक्यात असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे नाटकांच्या आयोजनावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. यासोबतच संबंधित सर्वांना मोठ्या आर्थिक संकटालाही तोंड द्यावे लागणार आहे. यासंदर्भात बुधवारी (दि.९) देसाईगंज येथील अखिल झाडीपट्टी नाट्य महामंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत यावर्षीच्या हंगामात नाटकप्रयोग आयोजित करायचे किंवा नाही यावर चर्चा होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष यशवंत ढोरे तसेच सचिव प्रल्हाद मेश्राम यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस