भामरागडला भेट : घरकूल लाभार्थ्यांना धनादेश लोकमत न्यूज नेटवर्क भामरागड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी शुक्रवारी भामरागड तालुक्याला भेट देऊन तालुक्यातील सिंचन विहीर, मामा तलावांचे खोलीकरण व अन्य कामाची पाहणी करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान पंचायत समितीत घरकूल लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरणही केले. जि. प. सीईओ शांतनू गोयल यांनी दुसऱ्यांदा भामरागड तालुक्याला भेट दिली. पंचायत समितीला भेट दिल्यानंतर येथील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर मलमपोडूर येथे भेट देऊन धडक सिंचन विहीर, तलावाच्या खोलीकरणाची पाहणी केली. त्यानंतर भामरागड येथील नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीला भेट दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहाय्याने डिजिटल करण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन केले व घरकूल व सिंचन विहिरीचे धनादेश वाटप केले. दरम्यान पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या अनेक समस्या सोडविण्याचे आश्वासनही दिले. यावेळी पं. स. सभापती सुखराम मडावी, उपसभापती प्रेमिला कुड्यामी, जि. प. सदस्य ज्ञानकुमार कौशी, पं. स. सदस्य इंदरशाह मडावी, गोई कोडापे, संवर्ग विकास अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर उपस्थित होते. रूपेश सहारे, एस. जी. वाघुले, पिंपळे, काळबांधे यांनी सहकार्य केले.
जि.प.सीईओंनी केली विकास कामांची पाहणी
By admin | Published: June 03, 2017 1:12 AM