शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

जुन्या पेन्शनसाठी जिल्हा परिषदेवर कर्मचाऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:50 AM

सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शेकडो सदस्य कर्मचाऱ्यांनी शनिवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली.

ठळक मुद्देआंदोलनकर्त्यांनी केले रक्तदान : मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले, लढा तीव्र करण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शेकडो सदस्य कर्मचाऱ्यांनी शनिवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला पाठविले. सामाजिक दायित्व पार पाडण्याच्या उद्देशाने आंदोलनापूर्वी जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.३१ आॅक्टोबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन परिभाषीत अंशदायी पेन्शन योजना व राराष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. सदर योजनेचे स्वरूप, त्याचे अंमलबजावणी बघता सदर योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात ढकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.प्राथमिक शिक्षकांची शाळा प्रगत असेल व शाळासिध्दीमध्ये अ श्रेणीत असेल तसेच नववी व दहावीचा निकाल ८० टक्केच्या वर असेल तर सदर शिक्षक वरिष्ठ श्रेणीसाठी पात्र ठरतील, अशी अट २३ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयाद्वारे शालेय शिक्षण विभागाने घातली आहे. मात्र सदर अट अन्यायकारक आहे. २३ आॅक्टोबरचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.आंदोलनात राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, उपाध्यक्ष अंकूश मैलारे, सचिव बापू मुनघाटे, कोषाध्यक्ष विजय मोडपल्लीवार, राज्य उपाध्यक्ष योगेश शेरेकर, राज्य समन्वयक दशरथ पाटील, महिला संघटीका वनश्री जाधव, सल्लागार विजय कौशीक, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, शंकर तोगरे, शिवाजी जाधव, सतीश खांडेकर, सुधाकर वेलादी, धनराज मोगरकर, अल्पेश बारापात्रे, त्रिमूर्ती भिसे, डंबाजी पेंदाम, खिरेंद्र बांबोळे, साईनाथ अलोणे, देवेंद्र डोहणे, स्मिता पुणेकर, दीपक भैसारे, माया दिवटे, प्रमोद कावडकर, श्रीकांत कुथे, आशिष धात्रक, पुरूषोत्तम पिपरे, रामटेके, पठाण, नरेंद्र कोत्तावार, किशोर कोहळे, बाळराजे, रघुनाथ भांडेकर, गणेश काटेंगे, डंबाजी पेंदाम, संजय लोणारे, अशोक बोरकुटे, नैना पोरकंटीवार, निलेश शेंडे, त्रिमुर्ती भिसे, प्राचार्य साईनाथ अद्दलवार, लतीफ पठाण, विजय कन्नाके, सुरेश पालवे, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव बापू मुनघाटे यांनी केले.जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या हस्ते डीसीपीएस विवरणपत्र वितरितअंशदायी पेन्शन योजनेंतर्गत कर्मचाºयांच्या वेतनातून पेन्शनसाठी काही रक्कम कपात केली जात आहे. मात्र मागील वर्षीपासून कपातीचे विवरणपत्र उपलब्ध झाले नव्हते. सदर विवरणपत्र देण्यात यावे, अशी मागणी कर्मचाºयांकडून करण्यात येत होती. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लावली. बाराही तालुक्यातील सर्व कर्मचाºयांचे विवरणपत्र तयार केले. सदर विवरणपत्र आंदोलन स्थळीच अजय कंकडालवार यांनी कर्मचाºयांना वितरित केले. यावेळी उपस्थित कर्मचाºयांनी जि.प. उपाध्यक्षांच्या कामाचे कौतुक केले.