शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

खिसे तपासणीने जि.प. कर्मचाऱ्यांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:07 AM

आरोग्य विभागाच्या पथकाकडून माणसांच्या शारीरिक स्वास्थ्याची तपासणी होतानाचे चित्र नेहमीच पहायला मिळते. मात्र शुक्रवारी जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारावर आरोग्य विभागाच्या पथकाकडून इमारतीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची तपासणी सुरू होती.

ठळक मुद्देखर्रा-तंबाखूच्या पुड्या सापडल्या : आरोग्य पथकाने वसूल केला दंड, दोन आठवडे चालणार मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आरोग्य विभागाच्या पथकाकडून माणसांच्या शारीरिक स्वास्थ्याची तपासणी होतानाचे चित्र नेहमीच पहायला मिळते. मात्र शुक्रवारी जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारावर आरोग्य विभागाच्या पथकाकडून इमारतीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची तपासणी सुरू होती. मात्र या तपासणीने काही कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.नुकत्याच काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार सरकारी कार्यालये व्यसनमुक्त करण्याच्या उपक्रमाची सुरूवात शुक्रवारी (दि.१८) जिल्हा परिषदेत करण्यात आली. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशीकांत शंभरकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मडावी, डॉ.विनोद म्हशाखेत्री, याशिवाय आरोग्य विभागातील कर्मचारी आनंद मोडक, नरेंद्र शेंडे, प्रवीण गेडाम आदी मंडळी सकाळी सकाळी ९.३० वाजता जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर दाखल झाली. बाजुचे प्रवेशद्वार आतून बंद करून केवळ मुख्य प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आले आणि कार्यालयात ड्युटीवर येणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे खिसे तपासणी सुरू झाली. हा काय प्रकार आहे? असा प्रश्न त्यांना पडल्यानंतर त्यांना परिपत्रकाची आठवण करून देत खिशात खर्रा किंवा तंबाखू पुडी आहे का याची तपासणी होत असल्याचे सांगण्यात आले. खिशातील खर्रा-तंबाखू जप्त करून दंडही वसूल केला जात होता. सकाळी ११ वाजेपर्यंत ६५० रुपयांचा दंड वसूल झाला होता.प्रत्येक कार्यालय तंबाखू व दारूमुक्त करायचे आहे. कर्मचाऱ्यांपासून त्याची सुरूवात करायची आहे. कोणाकडे दोन-चार वेळा तंबाखू-खर्रा आढळल्यास त्याच्यावर प्रशासकीय कारवाई किंवा निलंबनाची कारवाई होऊ शकते.- डॉ.शशीकांत शंभरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी