शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

राष्ट्रवादीत जि.प. उपाध्यक्ष पदावरून रस्सीखेच

By admin | Published: March 17, 2017 1:12 AM

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक २१ मार्च रोजी होऊ घातली आहे.

२१ ला मतदान : भाजपसोबत आघाडी झाल्यानंतरही धूसफूस गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक २१ मार्च रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे. त्यामुळे बहुमताचे २६ संख्याबळ ही आघाडी पूर्ण करण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपाध्यक्ष पदावरून धूसपूस सुरू आहे. ज्येष्ठ जि.प. सदस्य जगन्नाथ पाटील बोरकुटे यांनी या पदावर दावा केला आहे. तर राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष माजीमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या जि.प. च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हलगेकर या ही उपाध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या उपाध्यक्ष पदावरून जोरदार सत्ता संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या पुढाकाराने आदिवासी विद्यार्थी संघ व अन्य सदस्य एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप व राष्ट्रवादीची मैत्री झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष पदावरून ताणतणाव सुरू आहे. तिसऱ्यांदा निवडून आलेले जगन्नाथ पाटील बोरकुटे यांनी उपाध्यक्ष पदावर आपला दावा राहिल, असे सांगितले आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसकरिता दोन पदे सोडण्याची तयारी दर्शविली आहे. यामध्ये उपाध्यक्ष पदासह कृषी व पशुसंवर्धन सभापती पदाचा समावेश असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हलगेकर यांची उपाध्यक्ष पदी वर्णी लावली जाण्याची शक्यता असल्याने बोरकुटे यांची अडचण होणार आहे. राष्ट्रवादीच्या पाच सदस्यांमध्ये आत्रामांच्या बाजुने चार सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत बोरकुटेंना उपाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे बोरकुटेंना कृषी व पशुसंवर्धन सभापती पद देऊन त्यांचा मान राखला जाईल, असे दिसून येत आहे. यापूर्वीही २००७ ते २०१० या कालावधीत जगन्नाथ बोरकुटे यांनी कृषी व पशुसंवर्धन सभापती पद सांभाळले होते. याशिवाय भाजपला आणखी एका अपक्ष सदस्याचीही गरज आहे. त्यांना भाजप कोणते पद देते याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. काँग्रेसमध्ये अनेक नेते जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या मूडमध्ये नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षात सत्ता स्थापनेवरूनही अजुनही फार काही उत्साही हालचाली सुरू असल्याचे चित्र नाही. अलिकडेच चामोर्शी पंचायत समितीच्या निवडणुकीत अतुल गण्यारपवार यांच्या गटाकडून निवडून आलेल्या दोन सदस्यांनी काँग्रेसच्या बाजुने मतदान केल्याने गण्यारपवार काँग्रेसच्या खेम्यासोबत जि.प.मध्ये राहतील, असे दिसून येत आहे. मात्र भाजपचे नेते सभागृहात आपले बहुमत २८ पेक्षा कमी राहणार नाही, असा दावा करीत आहे. मात्र सध्या तरी परिस्थिती अधांतरी दिसत आहे. भाजपकडून जि.प. अध्यक्ष पदासाठी चामोर्शी तालुक्यातून निवडून आलेल्या दोन महिला सदस्य दावेदार आहेत. यापैकी कुणाची वर्णी अध्यक्षपदी लागते. याकडे अनेकांचे लक्ष आहे. चामोर्शी तालुक्यालाच अध्यक्ष पद मिळते की आरमोरी विधानसभा क्षेत्रात अध्यक्ष पद दिले जाते. याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अहेरी विधानसभा क्षेत्रालाही एक सभापती पद दिले जाण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी) आरमोरी क्षेत्राला एकदाच मिळाले अध्यक्ष पद गडचिरोली जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून २४ वर्षात १६ अध्यक्ष जिल्हा परिषदेला मिळाले. मात्र या संपूर्ण कालखंडात हरिष मने यांच्या रूपाने अध्यक्षपद आरमोरीला मिळाले. मधल्या काही काळात बसीर पटेल कुरेशी हेही कार्यकारी अध्यक्ष झालेत.मोठ्या कालावधीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून आरमोरी विधानसभा क्षेत्रात जि.प. अध्यक्ष पदाची संधी मिळाली नाही.