१० वाहने भंगारात : वारंवार ई-लिलाव करूनही प्रतिसाद नाहीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेली जुनी व निरूपयोगी वाहनांच्या विक्रीसाठी वारंवार ई-निविदा काढूनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. आता सर्वसाधारण सभेची परवानगी काढून ही वाहने खुल्या लिलाव प्रक्रियेतून मिळेल त्या भावात विकण्याचा पर्याय प्रशासनापुढे येऊन ठेपला आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून निरूपयोगी झालेल्या अॅम्बेसिडर कार, जीप, व्हॅन ही वाहने जिल्हा परिषदेच्या आवारात उभी आहेत. त्यापैकी ९ वाहनांची ई-निविदा आतापर्यंत ४ वेळा काढण्यात आली. त्यात ९ पैकी ४ वाहनांची विक्री झाली पण ५ वाहनांसाठी खरेदीदारच मिळेनासा झाला आहे. त्यात ३ कार आणि २ जीपचा समावेश आहे. त्यानंतर ७ वाहनांसाठी ३ वेळा ई-निविदा बोलविल्या. पण त्यातून केवळ २ वाहने गेली. ५ वाहने अजूनही शिल्लक आहेत. आता त्यासाठी चौथ्यांदा ई-निविदा बोलविण्यासाठी सर्वसाधारण सभेची (जी.बी.) परवानगी घेतली जाणार आहे. चारचाकी वाहन २ लाख ४० हजार किलोमीटर चालले किंवा त्याला १० वर्षे झाली तर ते निर्लेखित करून विक्रीसाठी काढले जाते. यांत्रिकी विभागाकडून तपासणी करून तो प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला जातो. त्यांच्या परवानगीने वाहन लिलावात काढले जाते. मात्र भंगार वाहनांना ग्राहक मिळत नसल्याने ही वाहने गेल्या अनेक वर्षापासून जि.प.च्या आवारात पडून आहेत.तर खुला लिलाव करणारवारंवार ई-लिलाव केल्यानंतर विक्री न झालेली ही वाहने शेवटी भंगारच्या स्वरूपात विकावी लागणार आहे. त्यासाठी खुला लिलाव घेतला जाणार आहे. आता पावसाळा लागल्यामुळे ही वाहने पुढील चार महिन्यात आहे त्यापेक्षाही खराब होणार आहेत. त्यामुळे जि.प.समोर भंगारात विक्री करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
जि.प.च्या वाहनांना खरेदीदार मिळेना!
By admin | Published: June 19, 2017 1:41 AM