वास्को: शांतीनगर, वास्को भागात मागच्या १२ दिवसात १० जणांना डेंग्यू सदृश्य ताप आल्याने त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. डेंग्यू सदृश्य ताप आलेल्या या दहा जणात १० महीने तसेच दिड वर्षाच्या मुलींचा समावेश असण्याबरोबरच अन्य दोन लहान मुलांचाही समावेश आहे. शांतीनगर, वास्को येथे सापडलेले हे डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण जवळपासच्याच परिसरातील रहीवाशी असून आरोग्य खात्याच्या अधिकाºयांनी येथे तपासणी केली असता याभागात काही ठीकाणी पाणी साचून तेथे डेंग्यू पसरविणाºया डासांची पैदास होत असल्याचे आढळून आले.
पावसाळ््यात डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे अनेक वेळा दिसून आलेले आहे. यावर्षी पावसाळ््यात मुरगाव तालुक्यातील विविध भागात डेंग्यूच्या रुग्णांवर आळा घालण्यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्राचे अधिकारी विविध प्रकारची पावले उचलत असल्याची माहीती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. पावसाळा सुरू होण्यास सुमारे १ महीना राहीलेला असून यापूर्वीच वास्कोतील शांतीनगर भागात मागच्या १२ दिवसात १० डेंग्यू सदृश्य ताप येणारे रुग्ण आढळल्याने काहींना सरकारी तर काहींना खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शांतीनगर परिसरातील जवळपासच्याच भागातील हे रुग्ण असल्याची माहीती सूत्रांकडून उपलब्ध झालेली असून यामुळे सद्या याभागात राहणाºया नागरिकात एके प्रकारचे भितीचे वातावरण पसरलेले आहे. याबाबत माहीती घेण्यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या डॉ. रश्मी खांडेपारकर यांना संपर्क केला असता शांतीनगर परिसरातील दहा जणांना डेंग्यू सदृश्य ताप आल्याने त्यांना इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगितले. दोन दिवसापूर्वी या परिसरातील एका दहा महीन्याच्या मुलीला डेंग्यू सदृश्य ताप आल्याने तिच्यावरही उपचार चालू आहे. तसेच यापरिसरातील अन्य एका दीड वर्षाच्या मुलीलाही डेंग्यू सदृश्य ताप आलेला असून याव्यतिरिक्त १० वर्षीय मुलीवर व ९ वर्षाच्या एका मुलाला सुद्धा डेंग्यू सदृश्य ताप आल्याने उपचार चालू असल्याची माहीती डॉ. खांडेपारकर यांनी दिली. शांतीनगर, वास्को परिसरातील डेंग्यू सदृश्य ताप आलेल्या या १० रुग्णांची ‘एनएस १’ चाचणी केली असता त्यांना डेंग्यू सदृश्य ताप असल्याचे स्पष्ट झाल्याची माहीती डॉ. खांडेपारकर यांनी पुढे दिली. यापैंकी काही रुग्णांवर सरकारी इस्पितळात तर काहीवर खासगी इस्पितळात उपचार चालू होता असे डॉ. खांडेपारकर यांनी माहीतीत पुढे कळविले.
शांतीनगर, वास्को येथील ज्या परिसरात डेंग्यू सदृश्य ताप आलेले रुग्ण सापडले होते तेथे आरोग्य खात्याच्या अधिकाºयांनी तपासणी केली असता या परिसरात काही भागात पाणी साचून डेंग्यू पसरवणाºया डासांची पैदास झाल्याचे दिसून आल्याची माहीती सूत्रांनी दिली. सदर परिसरातील एका इमारतीच्या खाली पाईपमधून पाण्याची गळती होऊन सदर पाणी साचून येथे डेंग्यू पसरवणाºया डासांची पैदास झाल्याचे दिसून आले. तसेच पाणी भरून ठेवलेल्या एका टाकीत व अन्य काही ठीकाणी सुद्धा पाणी साचून यात डेंग्यू पसरवणाºया डासांची पैदास झाल्याचे दिसून आल्याची माहीती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली. या प्रकाराची आरोग्य खात्याच्या अधिकाºयांनी त्वरित दखल घेऊन साचलेले पाणी खाली करून सदर ठिकाणी औषधाची फव्वारणी तसेच डेंग्यूचा पसारा होऊ नये यासाठी इतर उचित पावले उचललेली असल्याची माहीती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. उघड्यात ठेवलेल्या पाण्यात डेंग्यू पसरवणाºया डासांची पैदास होत असून नागरिकांनी स्वताच्या व जवळपासच्या लोकांच्या हीतासाठी डेंग्यू पसरवणाºया डासांची पैदास होऊ नये यासाठी उचित पावले उचलणे गरजेचे असल्याचे आरोग्य खात्यातील सूत्रांनी बोलताना सांगितले.