मडगाव: गोव्याच्या प्राणवाहिन्या अशी ओळख असलेल्या मांडवी व जुवारी या दोन प्रमुख नद्यांसह राज्यातील दहा नद्या प्रदुषित झाल्या असून या नद्यांतील पाण्याचे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडचे प्रमाण ज्यादा असल्याचे मत केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केले आहे. यासाठी केंद्रीय मंडळाने राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाला जबाबदार धरले असून यासंबंधी तातडीने उपाययोजना करण्याची सुचना केली आहे.
गोव्यातील दहा नद्या मैल्या होण्याचे कारण म्हणजे मलमुत्र विसर्जन आणि औद्योगिक सांडपाण्याचे विसर्जन मुख्य असून त्याशिवाय कचरा, प्लास्टीक व बेकायदा बांधकामे यांचा प्रमुख हात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. देशभरातील 350 पेक्षा जास्त नद्यांचे पाणी प्रदुषित झाले असून त्यात गोव्यातील दहा नद्यांचा समावेश आहे. त्यात मांडवी, जुवारी, साळ, तळपण, अस्नोडा, डिचोली, सिकेरी, तेरेखोल व वाळवंटी या नद्यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय हरित लवादातील या घटनेची गंभीर दखल घेऊन यासाठी राज्य प्रदुषण मंडळाला जबाबदार धरले आहे. हे प्रदुषण आताच रोखून धरले नाही तर भविष्यात पर्यावरणावर विपरित परिणाम होऊ शकतात असे नमूद करुन गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाला तातडीने उपाययोजना हाती घेण्याचा आदेश दिला आहे.
प्रदुषित झालेल्या नद्यांचे भागअस्नोडा ते शिरसई (अस्नोडा नदी)डिचोली ते कुडचिरे (डिचोली नदी)फोंडा ते ओपा (खांडेपार नदी)कांदोळी (सिकेरी नदी)तेरेखोल (तेरेखोल नदी)साखळी-डिचोली-पर्ये (वाळवंटी नदी)कुडचडे-मडकई (जुवारी नदी)माशेल तेवळवई ( मांडवी नदी)काणकोण (तळपण नदी)खारेबांद ते मोबोर (साळ नदी)