शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

१0८च्या महिला कर्मचाऱ्यांची परवड

By admin | Published: February 22, 2015 1:24 AM

पणजी : सात वर्षांपासून १0८ रुग्णवाहिकेमार्फत राज्यभर तातडीची रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेच्या महिला कर्मचाऱ्यांची होणारी

पणजी : सात वर्षांपासून १0८ रुग्णवाहिकेमार्फत राज्यभर तातडीची रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेच्या महिला कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय आंदोलनामुळे प्रथमच समोर येत आहे. असुरक्षित आणि अस्वच्छ अशा परिस्थितीत सात वर्षे रुग्णवाहिकेच्या महिला कर्मचारी केवळ नोकरी टिकवून ठेवण्यासाठी कोणतीही तक्रार न करता सेवा बजावत राहिल्या. ‘लोकमत’शी बोलताना काही महिला कर्मचाऱ्यांनी सेवा बजावताना होणारी परिस्थिती मांडली. २00८ साली राज्यात १0८ रुग्णवाहिका आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा गोव्याबाहेरील जीव्हीएमके इएमआरआय व्यवस्थापनांतर्गत चालवण्यात येत आहे. या सेवेत काम करण्यासाठी गोव्यातील तरुणांची भरती झाली. सुरुवातीला ३0 ते ३५ महिला कर्मचारी व्यवस्थापनांतर्गत सेवा बजावत होत्या. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे गोवा राज्य आरोग्य खाते आणि रुग्णवाहिकेद्वारे रुग्णांची काळजी घेतली जाणाऱ्या व्यवस्थापनाने मात्र महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. यामुळे बऱ्याच महिला कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या विविध तक्रारींना सामोरे जावे लागते. विविध शहरांतील १0८ रुग्णवाहिका स्थानिक पोलीस स्थानक व पोलीस आउट पोस्टवर उभे करून ठेवण्यात येतात. या रुग्णवाहिकेत एक वाहक आणि एक महिला मेडिकल सहकारी असायची. या कर्मचाऱ्यांना सेवेच्या वेळेत सातत्याने वाहनात बसून किंवा वाहनाबाहेर उभे राहावे लागे. रात्रीच्या वेळी रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्यास महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याची जबाबदारी व्यवस्थापन घेत नाही. पोलीस शौचालयांचाच वापर रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना करावा लागत असे. पोलीस आउट पोस्टवर महिला पोलीस कर्मचारी असत नाहीत. मात्र, आउट पोस्टवर ड्युटी करणाऱ्या रुग्णवाहिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना मात्र नाईलाजाने आउट पोस्टवरील शौचालयच वापरावे लागत असे. रात्रीच्या वेळी ड्युटी बजावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना रेस्ट रूमची मागणी करण्यात आली होती. मात्र, व्यवस्थापन महिलांसाठी सुरक्षित रेस्ट रुम पुरवण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत आले असल्याचा आरोप १0८ रुग्णवाहिकेच्या काही महिला कर्मचाऱ्यांनी केला. (प्रतिनिधी)