लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: निवडणूक आयोगाने राज्यातील नवी मतदारसंख्या जाहीर केली असून, १९ एप्रिलपर्यंत नव्या नोंदणीप्रमाणे राज्यात ११ लाख ७९ हजार ६४४ मतदार आहेत. ७ हजार ५४४ मतदारांची नावे वगळली असून यात २१९४ मृत मतदारांचा समावेश आहे तर ३७५ मतदार पत्त्यावर सापडू शकलेले नाहीत. इतर नावे अन्य कारणांसाठी वगळली आहेत.
यापूर्वी ५ जानेवारी २०२४ रोजी मतदार यादी जाहीर केली होती. त्यात राज्यात ११ लाख ६७ हजार २३७ मतदार दाखवले होते. गेल्या १९ एप्रिल रोजी मतदार सुधारित मतदार यादी निश्चित झाली त्यानुसार आता ११ लाख ७९ हजार ६४४ मतदार आहेत. उत्तर गोव्यात ५ लाख ८० हजार ७१० तर दक्षिण गोव्यात ५ लाख ९८ हजार ९३४ मतदार आहेत.
१८ ते १९ वयोगटातील नवीन मतदार १३,२४४
१८ ते १९ वयोगटातील १३,२४४ मतदार उत्तर गोव्यात तर १४,७८९ मतदार दक्षिण गोव्यात आहेत. उत्तर गोव्यात ४९७७ दिव्यांग मतदार आहेत तर दक्षिण गोव्यात ४४४६ दिव्यांग मतदार आहेत. ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ६,२८६ मतदार उत्तर गोव्यात तर ५,२१६ मतदार द. गोव्यात आहेत.