शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल
2
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
3
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
4
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
5
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
6
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
7
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
8
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
9
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
10
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
11
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
12
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
13
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
14
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
15
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
16
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
17
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
18
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
19
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
20
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद

गोव्यात कॅसिनो चालविणाऱ्या डेल्टा कॉर्पला ११,१३९ कोटी GST थकबाकीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 6:23 AM

कंपनीची एकूण थकबाकी १६,८२२ कोटी रुपये इतकी आहे.

पणजी: गोव्यात कोट्यवधींची उलाढाल करणारा कॅसिनो असलेल्या डेल्टा कॉर्पोरेशनला बंगळूर जीएसटी आयुक्तांनी ११,१३९.६१ कोटी रुपये जीएसटी थकबाकीची नोटीस बजावली आहे. कंपनीची एकूण थकबाकी १६,८२२ कोटी रुपये इतकी आहे.

कंपनीला ११,१३९.६१ कोटी रुपयांची पहिली नोटीस बजावण्यात आली असून दुसरी नोटीस, ५,६८२ कोटींची या कंपनीच्या ३ उपकंपन्यांना बजावण्यात आली आहे. कॅसिनो डेल्टिन डेन्झॉन्ग, हायस्ट्रीट क्रूझ आणि डेल्टा प्लेजर क्रूझ या त्या कंपन्या आहेत. या पैकी डेल्टा प्लेजर क्रूझ ही गोव्यात पर्वरी येथे आहे. या कंपनीचा मांडवीत ऑफशोर कॅसिनोही आहे. जुलै २०१७ ते मार्च २०२२ पर्यंतची जीएसटी थकबाकीची ही रक्कम आहे.

...कारणे दाखवाकंपनीकडून ही रक्कम फेडली नाही तर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. कंपनीने याची कबुली आपल्या वार्षिक अहवालातही दिली आहे. मात्र डेल्टा कॉर्पने आपल्या बचावार्थ जीएसटी संचालनालयाने लादलेली जीएसटी आणि नोटीसही मनमानी आहे असे म्हटले आहे. कर आणि बजावण्यात आलेली नोटीस दोन्हीही बेकायदेशीर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नोटिसीच्या कायदेशीर वैधतेला आव्हान देण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत असे कंपनीने म्हटले आहे.

‘लोकमत’ने चालविली होती वृत्तमालिकागोव्यात कायदे नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या विविध कॅसिनोंच्या कारनाम्यांचा पंचनामा करणारी वृत्तमालिका दैनिक लोकमतने  चालविली होती. कॅसिनोंकडून होणारा करबुडवेपणा, वाणिज्य खात्याच्या आदेशांना कॅसिनोंकडून दाखविल्या जाणाऱ्या वाकुल्या, मांडवीचे पाणी प्रदूषित करण्याचे प्रकार आणि इतर अनेक गैरकृत्यांचा पाढा वाचणारी वृत्तमालिका लोकमतने चालविली होती. या वृत्ताबद्दल  लोकांनीही लोकमतचे खूप कौतुक केले होते.

शेअर्स गडगडलेडेल्टा कॉर्पला बजावण्यात आलेल्या नोटिसीचा अपेक्षित परिणामही शेअर बाजारावर झाला. कंपनीचे शेअर्स विकण्याची एकच झुंबड उडाली आणि मुंबई शेअर एक्सचेंजच्या नोंदीनुसार डेल्टाकॉर्पचे शेअर्स ०.०२९ टक्क्यांनी घसरून १७५.२५ रुपयांवर बंद झाले. सोमवारी शेअर मार्केट खुला झाल्यानंतरही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीGSTजीएसटी