मडगाव : श्री हरिमंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाचा ११४ वा प्रतिवार्षिक कार्तिकी महाएकादशीचा दिंडी महोत्सव सोमवार दि. २० ते रविवार दि. २६ नोव्हेंबरदरम्यान मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. मुख्य दिंडी उत्सव शनिवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
सोमवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्री हरिमंदिरात श्रीची विधिवत षोड्शोपचार महापूजा व इतर धार्मिक कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता प्रख्यात वास्तुविशारद अभिजित साधले यांच्या हस्ते दिंडी महोत्सवाचे उद्घाटन व बक्षीस विरतण सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. संदीपबुवा मांडके पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन, मंगळवार, दि. २१ रोजी सायंकाळी ५ वाजता वास्को येथील बालभजनी कलाकारांचा भजनसंध्या कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. संदीपबुवा मांडके, पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन. बुधवार, दि. २२ रोजी श्री विठ्ठल-रखुमाई महिला संघ बोरी तर्फे चंद्रभागेतीरी भक्ती संगीताचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता ह.भ.प.संदीपबुवा मांडके, पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन. गुरुवार, दि. २३ तुळशी परिवार गोवा यांचा भजनाचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. संदीपबुवा मांडके, पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन. शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. संदीपबुवा मांडके, पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन. शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता महाअभिषेक व इतर धार्मिक विधी, सकाळी १० वाजता भजनाचा कार्यक्रम १२.३० वाजता महाआरती व महाप्रसाद (अन्नसंतर्पण) सायंकाळी ५ वाजता गोव्याबाहेरील वारकरी संप्रदायातर्फे भजनाचा कार्यक्रम सायंकाळी ६:१५ वाजता श्री माऊलींची धार्मिक ग्रंथासह श्रींची रथात स्थापना. ६:३० वाजता श्री हरिमंदिरासमोरील व्यासपीठावर प्रमुख निमंत्रित गायक कलाकारांची पहिली गायी बैठक यात गायक कलाकार संपदा कदम माने मुंबई व श्री सौरभ काडगावकर पुणे हे गायन सादर करतील.
रात्री ८ वाजता सुप्रसिद्ध दिंडी आयोजक बाबू गडेकर संचालित श्री दामोदर बोगदेश्वर दिंडी पथक वास्को व निमंत्रित वारकरी भजनी मंडळासह विठ्ठल-रखुमाई रथाचे श्री हरिमंदिर येथून प्रस्थान. रात्री ९ वाजता युको बँक न्यू मार्केट येथील प्रमुख आमंत्रित गायक व वादक कलाकारांची दुसरी गायनी बैठक, रात्री ११ वाजता नगरपालिका चौकात प्रमुख गायक व वादक कलाकारांची तिसरी गायनी बैठक त्यानंतर श्रींच्या दिंडी रथाचे श्री राम मंदिर श्री दामोदर साल व विठ्ठल मंदिर येथे प्रस्थान.
रविवार दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता श्रींच्या दिंडी रथाचे श्री हरिमंदिरात आगमन तद्नंतर गोपाळकाला महाआरती, रात्री ८ वाजता सुप्रसिद्ध गायिका सुस्मिरता डवाळकर मुंबई यांचे सुश्राव्य गायन या कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन श्रीया टेंगसे करणार आहेत. त्याना वादक कलाकार दयानिधेश कोसंबे, राया कोरगावकर, दत्तराज शेट्ये, दत्तराज सुर्लकर, राहुल खांडोळकर, महेश धामस्कर व अभिजित एकावडे साथसंगत करणार आहेत. रविवार, दि. १९ रोजी अखिल गोवा पातळीवर महिलांसाठी पाककला स्पर्धा व विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे.