किशोर कुबलपणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यापासून माजी आमदार कार्लुस आल्मेदांपर्यंत १४ आजी- माजी आमदारांच्या वैद्यकीय उपचारांवर सरकारी तिजोरीतून गेल्या दोन वर्षांच्या काळात तब्बल ५१ लाख ९४ हजार खर्च करण्यात आले. तर १२ आमदारांनी दोन टक्के अल्पव्याजी कर्जाने महागड्या मोटारी खरेदी केल्या.
विधिमंडळ खात्याकडून आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून ही माहिती प्राप्त झाली आहे. वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या ‘आरोग्या’वर सर्वाधिक २० लाख ३१ हजार ६६० रुपये खर्च करण्यात आले. त्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांनी वैद्यकीय खर्चाचा ८ लाख ३६ हजार ८२७ रुपयांचा परतावा घेतला. हळदोणे मतदारसंघात प्रथमच निवडून येऊन आमदार बनलेले अॅड. कार्लुस फेरेरा यांनी १,६१० रुपयेदेखील वैद्यकीय खर्चाचा परतावा घेतला. स्वत: व्यवसायाने डॉक्टर असलेले डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी १५,०१६ रुपये परतावा घेतला. आमदारांवर किती खर्च !आलेक्स सिक्वेरा : ३,०२,६९२ रुपयेआंतोनियो वास : १,२२,८४१ रुपयेकार्लुस फेरेरा : १,६१० रुपयेचंद्रकांत शेट्ये : १५,०१६ रुपयेदिगंबर कामत : ८,३६,८२७ रुपयेदयानंद सोपटे : ४,४८,५८० रुपयेगोविंद गावडे : १,३०,०७४ रुपयेइजिदोर फर्नांडिस : २,३३,१२४ रुपयेकार्लुस आल्मेदा : २०, ३१,६६० रुपयेकेदार नाईक : २,१५,३५४ रुपयेराजेश पाटणेकर : ३, ५२,७१२ रुपयेरमेश तवडकर : ६८,२९७ रुपयेविजय सरदेसाई : ३,५५,१४८ रुपयेविल्फ्रेड डिसा : ८०,६७० रुपयेगोव्याच्या आमदारांना महागड्या मोटारींचाही सोस आहे. दोन वर्षात सरकारकडून २ टक्के अल्प व्याजाने मिळणाय्रा कर्जाचा लाभ तब्बल १२ आमदारांनी घेतला. यापैकी ११ आमदारांनी कमाल १५ लाख रुपये कर्ज उचलले. उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी गेल्या फेब्रुवारीत बीएमडब्ल्यु एम३४० एक्स ड्राइव्ह ही महागडी कार खरेदी केली. १५ लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्याने उर्वरित व्यवस्था त्यांनी स्वत: केली. कार्लुस फेरेरा यांनी फॅार्च्युनर लिजेंडर ही डिझेलवरील मोटार खरेदी केली. नव्यानेच आमदार बनलेले आरजीचे वीरेश बोरकर यांनी टाटा सफारी खरेदी करण्यासाठी गेल्या मे महिन्यात सरकारी अल्पव्याजी कर्ज उचलले. कोणकोणत्या मोटारी!
आलेक्स सिक्वेरा : इनोव्हा क्रीटा (डिझेल)वीरेश बोरकर : टाटा सफारीक्रुझ सिल्वा : स्कॉर्पिओवेंझी व्हिएगश : एमजी ॲस्टर सॅवी कटसंकल्प आमोणकर : नेक्सन इव्ही मॅक्सकार्लुस फेरेरा : फॅार्च्युनर लिजेंडरराजेश फळदेसाई : मारुती सुझुकी ग्रॅण्ड विताराप्रवीण आर्लेकर : थार डिझेल एलएक्सजीत आरोलकर : क्रेटा १.५ सीआरडीआयजोशुआ डिसोझा : बीएमडब्ल्यु एम ३४० एक्सविजय सरदेसाई : किया कार्निव्हलरमेश तवडकर : किया कार्निव्हलदरम्यान, आमदारांनी मोटारी व वैद्यकीय उपचारांसाठी सवलतीचा लाभ घेतला असला तरी गेल्या दोन वर्षात एकाही आमदाराने गृह बांधणीसाठी कर्ज उचललेले नाही.आता घ्या, ४० लाखांपर्यंत मोटार!
दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कायदा दुरुस्ती विधेयक संमत करुन आमदारांची पेन्शन वाढवण्यात आलेली आहे. त्याच बरोबर मोटार खरेदीसाठी कर्जमर्यादा १५ लाखांवरून ४० लाख रुपये केली आहे. पेट्रोल किंवा डिझेल दरमहा ३०० लिटरवरून ५०० लिटर,घर खरेदीसाठी कर्ज मर्यादा ३० लाखांवरून ४५ लाख रुपये करण्यात आली आहे. सभापतींसाठी वैद्यकीय भत्ता ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आला आहे.ही वाढ केल्यानंतर आजपावेतो एकाही आमदाराने मोटारीसाठी कर्जाकरिता अर्ज केलेला नाही, अशी माहितीही आरटीआय उत्तरातून प्राप्त झालेली आहे.