नारायण गावस
पणजी - गृह रक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटनामध्ये १४३ गृह रक्षक स्वयंसेवकांची प्रारंभी फक्त तीन वर्ष कालावधीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागितले आहे. त्यांना प्रती दीन ८७८ रुपये मानधन देण्यात येणार आहे. २ एप्रिल पर्यंत इच्छूकांनी अर्ज करावे. वय वर्ष २० ते ५० वयाेगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता ८ वी उत्तीर्ण असणे गरचे आहे. तसेच किमान उंची पुरुष ५. ५ आणि महिला ४ .११शारीरिक क्षमता चाचणी पुरुष उमेदवारांसाठी १ कि. मी. धावणे ५ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे आवश्याक आहे तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे ५ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे आवश्यक आहे.
उमेदवारी अर्ज आल्तिनो येथील गृह रक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटना, गोवा राखीव पोलीस कॅम्पच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. हे अर्ज कार्यालयीन दिवशी सकाळी १० ते दु. १ वा. आणि २ ते ५.३० या वेळेत प्रती अर्ज रू. २० या दराने उपलब्ध आहेत. पूर्ण भरलेले अर्ज गृह रक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटना गोवा राखीव पोलीस कॅम्पच्या कार्यालयात २ एप्रिल किंवा त्याआधी सादर करावेत त्या नंतर मिळालेले अर्ज नाकारण्यात येतील. उमेदवारांना १०० गुणांपैकी गुणवत्तेनुसार खालीलप्रमाणे गुण देऊन त्या निकषावर उमेदवारांची नावनोंदणी केली जाईल. यात शारीरिक चाचणी ५ गुण, लेखी चाचणी ३५, तोंडी चाचणी १५, शैक्षणिक पात्रता १०, ट्रेडमधील डिप्लाेमा ५, संगणक प्रशिक्षण ५, ड्रायविंग परवाना ५, क्रीडा ५ , प्रमाणपत्रे ५, माजी सैनिक १० असे एकूण १०० गुणांची परिक्षा घेतली जाणार आहे.