वास्को: गुरूवारी मुरगाव बंदरात १४५० विदेशी जहाजावर खलाशी म्हणून काम करणाºया गोमंतकीय बांधवांना घेऊन दाखल झालेल्या ‘सेलेब्रेटी इंन्फनेटी’ जहाजावरील सर्व बांधवांचे कोरोना विषाणूबाबत केलेल्या चाचणीचे अहवाल शुक्रवारी रात्रीपर्यंत आले असून ते ‘नेगेटीव्ह’ असल्याने या बांधवांना जहाजवरून घरी पाठवण्याच्या पुढच्या प्रक्रीयेला सुरवात करण्यात आली आहे. या जहाजावरील बांधवांचे अहवाल ‘नेगेटीव्ह’ आल्यानंतर त्यांना ‘एसओपी’ नियमांचे पालन करून घरी पाठवण्याच्या प्रक्रीयेला सुरवात करण्यात आलेली असून शुक्रवारी उशिरा रात्रीपर्यंत सुमारे ४०० बांधवांना त्यांच्या घरी पाठवण्यात आल्याची माहीती एमपीटी चे वाहतूक व्यवस्थापक (मुरगाव बंदराचा) जेरोम क्लेमेंन्त यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता दिली.
‘सेलेब्रेटी इंन्फेनेटी’ व ‘एंथम आफ द सी’ अशा दोन विदेशी जहाजावर काम करणाºया १४५० गोमंतकीय बांधवांना घेऊन ‘सेलेब्रेटी इंन्फेनेटी’ हे जहाज गुरूवारी सकाळी मुरगाव बंदरात दाखल झाले. या जहाजातून गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झालेल्या सदर गोमंतकीय बांधवांचे कोरोना विषाणूबाबत अहवाल जो पर्यंत येत नाहीत तो पर्यंत त्यांना या जहाजावरच ठेवण्यात येणार असल्याची माहीती एमपीटी सूत्रांकडून गुरूवारी प्राप्त झाली होती. तसेच आरोग्य खात्याच्या डॉक्टर व कर्मचाºयांनी जहाजातून आलेल्या या १४५० बांधवांचे कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी नमूने (स्वेब टेस्ट) घेण्याच्या कामाला गुरूवारी सुरवात केल्याची माहीती उपलब्ध झाली होती. याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी शुक्रवारी रात्री एमपीटी चे वाहतूक व्यवस्थापक जेरोम क्लेमेंन्त यांना संपर्क केला असता सदर जहाजातून आलेल्या सर्व बांधवांचे कोरोना विषाणूबाबतच्या चाचणीचे अहवाल शुक्रवारी रात्री पर्यंत आलेले असल्याची माहीती त्यांनी देऊन सर्वांचे अहवाल ‘नेगेटीव्ह’ आल्याची माहीती दिली. या जहाजातून आलेला एक व्यक्ती सदर जहाजाबरोबर पुन्हा निघणार असल्याने १४५० पैंकी १४४९ जणांचीच कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यात आली होती अशी माहीती जेरोंम यांनी याप्रसंगी दिली. जहाजावरील सर्वांचे अहवाल ‘नेगेटीव्ह’ आल्याने त्यांना ‘एसओपी’ द्वारे लागू केलेल्या नियमानुसार घरी पाठवण्याच्या प्रक्रीयेला सुरवात करण्यात आलेली असून येथे त्यांच्या इमिग्रेशन क्लीयरंन्स तसेच कस्टम क्लीयरंन्सच्या प्रक्रीयेला सुरवात केली असल्याची माहीती त्यांनी दिली. दरम्यान या जहाजावरील सुमारे ४०० जणांची घरी पाठवण्यापूर्वीच्या सर्व प्रक्रीया पूर्ण झाल्याने त्यांना शुक्रवारी उशिरा रात्री घरी पाठवण्यात आले असल्याचे जेरोम यांनी माहीतीत कळविले. जहाजातून आलेल्या इतर बांधवांच्या इमिग्रेशन क्लीयरंन्स, कस्टम क्लीयरंन्स तसेच ‘एसओपी’ च्या नियमानुसार लागू करण्यात आलेल्या सर्व प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर राहीलेल्या बांधवांना शनिवारी त्यांच्या घरी पाठवण्यात येणार असल्याची माहीती जेरोम क्लेमेंन्त यांनी शेवटी दिली.