पणजी : कोविड बळींच्या संख्येबाबत शुक्रवारी गोव्याने सहाशेचा आकडा ओलांडला. गेल्या चोवीस तासांत कोविडने पाचजणांचा जीव घेतला. यामुळे राज्यात कोविड बळींची एकूण संख्या शुक्रवारी ६०२ झाली. ओक्टोबरमध्ये १७४ व्यक्ती दगावल्या.
२२ जून रोजी राज्यात कोरोनाचा पहिला बळी नोंद झाला होता. गेल्या सव्वा चार महिन्यांत सहाशे व्यक्ती मरण पावल्या. बहुतांश मृत्यू ओगस्ट, सप्टेंबर व ओक्टोबर महिन्यात झाले. दि. ३० सप्टेंबरपर्यंत एकूण मृत्यू ४२८ होते. आता संख्या सहाशेच्या पुढे गेली. म्हणजेच ओक्टोबरमध्ये दि. ३० पर्यंत एकूण १७४ मृत्यूंची नोंद झाली. सप्टेंबरच्या एका महिन्यात २३४ कोविड बळींची नोंद झाली होती. ओगस्टमध्ये संख्या १५० होती.
शुक्रवारी गोमेको इस्पितळात चौघांचा बळी गेला व होस्पिसियो इस्पितळात एकटा मरण पावला. दोन रुग्ण इस्पितळात आल्यानंतर चोवीस तासांत मरण पावले. एकटा पंधरा मिनिटांत मरण पावला.
वास्को येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्ण, हळदोणा येथील ७७ वर्षीय महिला रुग्ण, डिचोली येथील ७० वर्षीय रुग्ण, पेडणे येथील ६४ वर्षीय रुग्ण व केपे येथील ३६ वर्षीय तरुण यांचे कोविडमुळे निधन झाले.
महिना व कोविड बळींची संख्या
....................................................
ओगस्ट...........१५०
..........................................
सप्टेंबर..............२३४
..............................................
ऑक्टोबर.............१७४