लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात गोवा आभियांत्रिक विद्यालयाकडून धोकादायक ठिकाणांचा अभ्यास करुन एक अहवाल जारी करण्यात आला आहे. यात १८ पर्यावरणीय संवेदनशील ठिकाणे त्यांनी शोधून काढली आहेत. अनेक भूस्खलन ठिकाणे तयार झाली असून सरकारने उपाय योजना करावी, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केली.
मुरगाव, धारबांदोडा, केपे, सांगे, पेडणे येथे ही घातक ठिकाणे आहेत. सरकारने या भागाचा अभ्यास करणे गरजेचे बनले आहे. जेथे नो डेव्हलोपमेंट झोन आहे, तिथेही काम सुरु आहे. सरकार लक्ष न दिल्यास राज्यातही वायनाडसारख्या घटनेची भिती त्यांनी व्यक्त केली.
इस्रोने केलेल्या भूस्खलनाच्या अभ्यासात गोव्याचेही नाव आहे. या संदर्भात चेतावणी देणारा माधव गाडगीळ अहवाल जारी करण्यात आला होता, परंतु केरळ आणि शेजारील राज्य कर्नाटकच्या सरकारने लोकांच्या व्यावसायावर, सरकारच्या आर्थिक उलाढालावर परीणाम होणार असल्याचे कारण देत हा अहवाल स्विकारला नाही, असेही सरदेसाई यांनी पुढे सांगितले.