वासुदेव पागी
पणजी : ६ कोटी चौरस मिटर जमीन रुपांतरण घोटाळ्यात नगर नियोजन खात्याचे दोन अधिकारी तसेच एक संगणक सॉफ्टवेअर आउट्सोर्स कंपनी संशयाच्या घेऱ्यात आली असून दोन्ही अधिकाऱ्यांच्या तसेच या कंपनीच्या भुमिकेचीही चौकशी केली जाणार असल्याचे नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी म्हटले आहे. ६ चौरस मीटर जमीनी ज्या सेटलमेन्ट विभागात होत्या त्यांचे इतर स्वरूपात रुपांतरण करून लोकांचे नुकसान करण्याची हरकत करणाऱ्यांची माहिती आपल्याला मिळाल्याचे राणे यांनी म्हटले आहे.
राज्यस्तरीय समितीचा यात मोठा हात असून त्या समितीतील दोन अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्यांचा पाडा वाचण्याचे काम सध्या सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. छाननी समिती सर्व कागदपत्रांचा अभ्यास करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अधिकाऱ्यांबरोबरच एक संगणक सॉफ्टवेअर कंपनीच्या कामाचीही छाननी होत आहे. खात्याला रेशनलायजड डेटा पुरविण्याचे काम या कंपनीला आउटसोर्स करण्यात आले होते. हा डेटाही आपल्याला मिळाला आहे आणि कंपनीनीने खात्याच्या राज्य स्तरीय समतीतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेली सर्व कामे आपल्या नजरेखाली आली आहेत असा गर्भीत इशारा मंत्र्यांनी दिला आहे.
फार्म हाऊसचे झाले हॉटेलप्रादेशिक आराखडा २०२१ मध्ये कशा प्रकारे बेकायदेशीर कामे करण्यात आली त्याचे एक उदाहरणही मंत्री राणे यांनी सोशल मिडियावरून दिले आहे. हडफडे येथे एकाला फार्म हाऊससाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु त्या ठिकाणी आज एक हॉटेल उभे आहे असे त्यांनी सांगितले. या प्रकरणातही सविस्तर चौकसी होईल आणि दोषींवर कारवाई होईल असे मंत्र्यांनी म्हटले आहे. कागदपत्रे होतील सार्वजनिकनगर नियोजन खात्यात असलेली प्रादेशीक आराखडा २०२१ संबंधी सर्व कागदपत्रे विश्वजित राणे यांनी आपल्या कार्यालयात मागवून घेतली आहेत. ही कागदपत्रे योग्यवेळी सार्वजनिकही करण्यात येतील, असे त्यांनी म्हटले आहे.