शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

गोवा फॉरवर्डचे २0 उमेदवार सप्टेंबर अखेरपर्यंत जाहीर

By admin | Published: August 19, 2016 2:08 AM

पणजी : गोवा फॉरवर्ड पक्ष आपले २0 उमेदवार सप्टेंबरअखेरपर्यंत जाहीर करणार आहे. काँग्रेसबरोबर युतीचा पर्याय पक्षाने खुला ठेवला

पणजी : गोवा फॉरवर्ड पक्ष आपले २0 उमेदवार सप्टेंबरअखेरपर्यंत जाहीर करणार आहे. काँग्रेसबरोबर युतीचा पर्याय पक्षाने खुला ठेवला असून प्रमुख १२ प्रश्न घेऊन पक्ष जनतेच्या दरबारात जाणार आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर तिंबले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाला अधिमान्यता दिल्यानंतर ही पहिलीच पत्रकार परिषद होती. तिंबलो म्हणाले की, सरकार जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर असंवेदनशील बनले आहे. विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीची हत्या केली. आमच्या आमदारांनी अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना बोलू दिले नाही. रेड कॅटेगरीतील उद्योगांना पायघड्या घालून पर्यावरणाची हानी केली जात आहे. नद्यांचे राष्ट्रीयीकरण करून सरकार मच्छीमारांचा उदरनिर्वाह तसेच मत्स्यसंपत्ती नष्ट करायला निघाले आहे. कॅसिनो तसेच अमली पदार्थांना प्रोत्साहन दिले जात आहे. उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ हा घाऊक भू-रुपांतराचा अड्डा बनला आहे. वीज दर प्रचंड वाढविले आहेत. किनारा सफाई तसेच कचरा व्यवस्थापनात घोटाळे करण्यात आले आहेत. सरकार राज्याला कर्जाच्या खाईत लोटत असून १८ हजार कोटींचे कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. शिक्षण माध्यमप्रश्नी राजकारण केले जात आहे. आणखी एक समिती स्थापन करून पुन्हा घोळ घातला आहे. सर्व मंत्रालयांमध्ये घोटाळे झाले आहेत. खाणी पूर्ण वेगाने सुरू होऊ शकलेल्या नाहीत. प्रादेशिक आराखड्याच्या प्रश्नावर जनतेची थट्टा चालवली आहे. हे १२ विषय घेऊन आम्ही आगामी निवडणुकीत जनतेच्या दरबारात जाऊ, असे तिंबले यांनी सांगितले. पक्षाचे मुख्य प्रवक्ते प्रशांत नाईक म्हणाले, की हे सरकार व्हीप काढून अविश्वास ठराव जिंकते, पण आगामी निवडणुकीत जनतेच्या दरबारात साम, दाम, दंड भेद वापरला तरी जिंकू शकणार नाही. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोध करताना अदानी, अंबानी यांच्याकडे नद्या गहाण टाकायला सरकार निघाले आहे, असा आरोप त्यांनी केला. मच्छीमारांचा उदरनिर्वाह नष्ट होईल तसेच अंतर्गत जलवाहतुकीवरही निर्बंध येतील, असे ते म्हणाले. याबाबत वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला. पुढील दाराने राष्ट्रीयीकरण आणि मागील दाराने खासगीकरण असा हा डाव असल्याचा आरोप तिंबले यांनी केला. प्रवक्ते तन्वीर खतिब म्हणाले की, आगामी निवडणुकीसाठी पक्षाने रोड मॅप तयार केला असून सत्तेवर आल्यास पाव, मासळी व नारळ लोकांना सवलतीच्या दरात दिले जातील. (प्रतिनिधी)