पणजी : चार फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी व अपक्ष उमेदवारांनी एकूण किती रक्कम खर्च केली, याचे कागदोपत्री पुरावे सापडणार नाहीत; पण विविध उमेदवारांशी, काही सरपंच, पंचसदस्य तसेच राजकीय पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी खासगीत बोलल्यानंतर निवडणुकीत झालेल्या खर्चाचे खरे प्रमाण किती असावे, याचा पूर्ण अंदाज येतो. राज्यातील चाळीसही विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून निवडणुकीवेळी राजकारण्यांनी सुमारे २00 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती ढोबळपणे विविध घटकांशी केलेल्या चर्चेवरून प्राप्त झाली. नोटाबंदीनंतरही एवढा मोठा खर्च झाला.विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण २५१ उमेदवारांपैकी ६० टक्के उमेदवार करोडपती आहेत. पंधरा-सोळा जणांनी आपली मालमत्ता पाच ते दहा कोटींपेक्षा जास्त असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगास दाखवून दिले आहे. तीन-चार जणांनी ५0 कोटींपेक्षाही जास्त मालमत्ता दाखवली. एकूण २0 उमेदवारांची मालमत्ता ४00 कोटींपेक्षा जास्त आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले बहुतांश प्रस्थापित उमेदवार किंवा आमदार व मंत्री धनिक आहेत. (खास प्रतिनिधी)
राजकारण्यांकडून २00 कोटींचा चुराडा
By admin | Published: February 12, 2017 1:27 AM