-नारायण गावस
पणजी: राज्यात २०१९ ते २०२३ या पाच वर्षांत २१ पर्यटकांचे बुडून मृत्यू झाले आहेत यात सर्वाधिक जास्त मृत्यू हे समुद्रात बुडून झाले आहेत. अशी माहिती गोवा पर्यटन मंत्री राेहन खंवटे यांनी अधिवेशनात लेखी उत्तरातून दिली आहे. आमदार कृष्णा साळकर यांनी हा लेखी प्रश्न मांडला होता.
राज्यात २१ पर्यटकांचा मृत्यू गेल्या पाच वर्षांत झाला यातील १७ पर्यटकांचा मृत्यू हा समुद्रात बुडून झाला आहे. तर धबधब्यांवर ३ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एका पर्यटकाचा मृत्यू हा स्विमिंगपूलमध्ये आंघोळ करताना बुडून मृत्यू झाला आहे, अशी माहिती मिळाली आहे.
राज्यातील सुंदर असे समुद्र किनारे पाहण्यासाठी देश विदेशातील लाखो पर्यटक येत असतात. बहुतांश पर्यटक हे समुद्र किनारी आंघोळ करण्यासाठी येतात. पण काही पर्यटक हे दारुच्या नशेत खाेल समुद्रात जातात सुचनांचे पालन करत नाही अशा विविध कारणांसाठी पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
पर्यटन खात्यांकडून दृष्टी जीवरक्षक तैनात
राज्यातील समुद्र किनारी पर्यटकांचा बुडून मृत्यू हाेतात यासाठी पर्यटन खात्याने दृष्टी कंपनीचे जीवरक्षक तैनात केले आहेत. या जीवरक्षकांकडून वर्षाला हजारो पर्यकांना बुडताना वाचविण्यात आले आहे. अनेक जीवरक्षक दिवस रात्र समुद्र किनारी पहारा देत असतात. काही ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्या आहेत. यासाठी पर्यटन खाते वर्षाला करोडाे रुपये खर्च करत असते.
वर्ष : मृत्यू२०१९ : ७२०२० : ३ २०२१: २ २०२२ : ४ २०२३ : ५