शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
3
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
6
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
7
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
8
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
9
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
10
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
11
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
12
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
13
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
14
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
15
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
16
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
17
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
18
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
19
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी

27.26 कोटींचा वित्त आयोगाचा निधी मडगाव पालिकेकडून विनावापर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 8:52 PM

14व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ संपायला केवळ दोन महिने बाकी असताना या आयोगाकडून मडगाव पालिकेला मिळालेल्या अनुदानापैकी तब्बल 27.26 कोटी रुपयांच्या अनुदानाचा पालिकेने वापरच न केल्याचे उघड झाले आहे.

मडगाव: 14व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ संपायला केवळ दोन महिने बाकी असताना या आयोगाकडून मडगाव पालिकेला मिळालेल्या अनुदानापैकी तब्बल 27.26 कोटी रुपयांच्या अनुदानाचा पालिकेने वापरच न केल्याचे उघड झाले आहे. येत्या दोन महिन्यात या निधीचा उपयोग केला नाही तर हे पैसे पालिकेला परत करावे लागणार आहेत.14व्या वित्त आयोगाकडून मडगाव पालिकेला वेगवेगळ्या कामासाठी एकूण 29.49 कोटींचा निधी मंजूर झाला होता. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ही रक्कम 29.04 कोटी एवढी बाकी राहिली होती. त्यापैकी पालिकेला केवळ 1.77 कोटींचाच वापर करणे शक्य झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी तातडीची बैठक घेऊन या निधीचा येत्या दोन महिन्यांत कसा विनियोग करता येईल याचा आढावा घेण्यात आला. 1 एप्रिलपासून 15व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ सुरू होणार आहे. यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेविका सुचिता मळकण्रेकर यांनी हरकतीचा मुद्दा मांडताना जर पालिकेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होता तर त्याचा विनियोग का झाला नाही, असा सवाल केला. यावेळी माजी नगराध्यक्ष बबिता प्रभूदेसाई यांनी या निधीखाली कित्येक प्रकल्पांची आखणी केली होती. मात्र पालिकेच्या तांत्रिक विभागाने योग्य त्या प्रमाणात त्याचा पाठपुरावा न केल्याने ही कामे मार्गी लागू शकली नाहीत, असे सांगितले.यावेळी या निधीतून सुक्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी मडगाव पालिकेच्या मागे तसेच एसजीपीडीए मार्केटात पार्किंगसाठी शेड उभारण्याबरोबरच सां जुङो आरियल येथे औद्योगिक वसाहतीतही कच-याच्या बेलिंगसाठी शेड उभारण्याचे ठरविले. एसजीपीडीएच्या किरकोळ मासळी बाजारात तसेच होलसेल मासळी बाजारात पाच टन क्षमतेचे दोन बायोमिथेनायझेशन प्रकल्प सुरू करण्याबरोबरच एसजीपीडीएच्या भाजी व फळ मार्केटातील कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन टन क्षमतेचा बायोमिथेनायझेशन प्रकल्प उभारण्याचे मंजूर करण्यात आले. सोनसड्याच्या कचरा यार्डाला कुंपण बांधण्याबरोबरच गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून एक फोर्क लिफ्ट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय यापूर्वी सरकारकडे जे विकासकामांचे प्रकल्प पाठविले होते ते मागे घेऊन या निधीतून ते पूर्ण करण्याचे ठरविले.यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक रुपेश महात्मे यांनी या निधीतून प्रत्येक चार प्रभागासाठी एक असे सहा लहान कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची शिफारस केली. तर नगरसेविका डॉरीस टेक्सेरा व अविनाश शिरोडकर यांनी प्रत्येक प्रभागात या निधीतून 500 ते 1000 गटारावर बसविण्यासाठी लाद्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली. या निधीतून नाल्याची सफाई हाती घेता येणे शक्य आहे, असे महात्मे यांनी यावेळी सुचविले.