शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

दिल्लीतील अग्निशमन विभागातील ३० प्रशिक्षणार्थींनी घेतले पणजी केंद्रात प्रशिक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2024 4:47 PM

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचे संचालक नितीन व्ही. रायकर यांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल प्रशिक्षणार्थी उप-अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

नारायण गावस पणजी : दिल्ली येथील अग्निशमन विभागातील ३० प्रशिक्षणार्थी उप अधिकाऱ्यांनी पणजी येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाद्वारे ५० व्या बाह्य उप-अधिकाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण प्रायोजित करण्यात आले होते. १८ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ या काळात त्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण काळात गोवा राज्यातील विविध उद्योग, रुग्णालय, मॉल, विमानतळ आदी ठिकाणांना भेटी दिल्या.

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचे संचालक नितीन व्ही. रायकर यांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल प्रशिक्षणार्थी उप-अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच मिळालेले प्रशिक्षण आणि ज्ञानाबाबत आपल्या सहकाऱ्यांनाही शिक्षित करावे असे आवाहन संचालक रायकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना केले. यावेळी उत्तर विभागाचे सहायक विभागीय अधिकारी बॉस्को फेराओ, स्टेशन अग्निशमन अधिकारी, उप-अधिकारी आणि गोवा राज्य अग्निशमन दल प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक उपस्थित होते. स्टेशन अग्निशमन अधिकारी (प्रशिक्षण विभाग) रवी नाईक यांनी सूत्रसंचालन केले तर बोस्को फेराव यांनी आभार मानले.