वास्को: दक्षिण गोव्यातील चिखली, दाबोळी येथे राहणाºया ३० वर्षीय हनमंत्तप्पा मल्लप्पा ताली यांने खोलांत येथे असलेल्या जंगली भागातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. हनमंत्तप्पा यांने आत्महत्या का केली यामागचे नेमके कारण वेर्णा पोलीसांना अजून स्पष्ट झाले नसून ते या प्रकरणात अधिक चौकशी करत आहेत.
वेर्णा पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक रियंका नाईक यांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी (दि.२८) सकाळी १०.३० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. हनमंत्तप्पा ताली हा तरुण गेल्या तीन वर्षापासून गोवा शिपयार्ड मध्ये कामाला असून तो मूळचा गदक, कर्नाटक येथील आहे. खोलात समुद्र किनाºयापासून सुमारे तीन कीलोमीटर अंतरावर असलेल्या जंगली भागात एका तरुणाचा मृतदेह गळफास लावून झाडाला लटकत असल्याची माहीती सोमवारी पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर दाखल होऊन चौकशी करण्यास सुरवात केली असता तो मृतदेह हनमंत्तप्पा याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलीसांनी मृतदेह खाली उतरवून त्याचा पंचनामा केल्यानंतर तो शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. पोलीस उपनिरीक्षक रियंका नाईक यांनी दिलेल्या माहीतीनुसार हनमंत्तप्पा याचा सुमारे १० महीन्यापूर्वी विवाह झाला आहे. त्याची पत्नी कर्नाटक येथे त्यांच्या गावात असून ती ‘एम कॉम’ चे शिक्षण घेत असल्याची माहीती पोलीसांना मिळाली आहे. हनमंत्तप्पा याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून वेर्णा पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक रियंका नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.