पणजी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोवा मुक्तिच्या हीरक महोत्सवी वर्षात ३०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन अजून पूर्ण केले नाही, याकडे विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्ली भेटीत केंद्राकडे अर्थसंकल्पपूर्व बैठकीत ८ हजार कोटी रुपयांची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. युरी म्हणाले कि,‘मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या निधीवर अवलंबून राहून भविष्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा स्वतःच्या निधीचे विवेकपूर्ण व्यवस्थापन करण्यावर भर द्यावा.युरी म्हणाले कि,‘केंद्रीय वित्तमंत्री सीतारामन् ३०० कोटी रुपये निधी देण्याचे स्वत:चे आश्वासन पूर्ण करु शकलेल्या नाहीत. त्यांच्याकडून ८ हजार कोटी रुपये निधीची अपेक्षा म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्ने पाहण्यासारखाच प्रकार आहे.’