ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 20 - विदेशी लोक गोव्यात येतात आणि गुन्हे करून कुठे जातात याचा काही ताळतंत्र राहिलेला नाही. मागील ५ वर्षांत गोव्यात आलेल्या ५८३ विदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले होते. परंतु त्यातील ३३३ लोक अजूनही पोलिसांना सापडलेले नसल्यामुळे ते भुमिगताच्या यादीत आहेत. विदेशी लोकांनी गोव्यात जमीनी व इतर मालमत्ता बळकावल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते परंतु हे लोक गोव्यात गुन्हे करूनही त्यांचे कुणी बिघडवू शकत नाही अशी परिस्थिती आहे. विदेशी लोक गोव्यात येवून गुन्हे करूशकतात असेच नव्हे तर गुन्हे करून पोलिसांना न सापडता भुमिगतही राहू शकतात हे पोलीस खात्यानेच दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत अहे. विदेशी नोंदणी विभागाचा ताबा असलेले पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी दिलेल्या माहिती नुसार २०११ ते २०१६ या वर्षांत ५८३ विदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंद झाले होते. त्यातील ३३३ लोक अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. या लोकांनी आपल्या देशात पळ काढला असावा असे म्हणावे तर विदेशी विभाग नोंदणी खात्याच्या परवानगी शिवाय देशातील कोणत्याही विमानतळावरून ते जाऊ शकत नाहीत. आतापर्यंत या ३३३ लोकांपैकी एकाही माणसाला विदेशी विभागाकडून परवनगी मिळालेली नाही. त्यामुळे हे लोक विदेशात पळण्याची श्क्यताही नाही. त्यामुळे हे लोक भुमिगत झाले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. ७२ विदेशींची रवानगीअतापर्यंत पोलिसांनी विविध गुन्हे केलेल्या ७२ विदेशी नागरिकांची रवानगी त्यांच्या देशात केली असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. ज्या लोकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत आणि जी प्रकरणे निकालात काढली आहेत अशाच लोकांची रवानगी त्यांच्या देशात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रशियन आणि इंग्लंडच्या नागरिकांची संख्या सर्वाधिक अनुक्रमे १६ व १० अशी आहे.
गोव्यात ३३३ विदेशी गुन्हे करून भुमिगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2016 7:05 PM